High Cholesterol : या लक्षणांवरुन कळेल शरीरात वाढलाय कोलेस्टेरॉल, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

High Cholesterol Disease : बदलेली जीवनशैली, वातावरणातील बदल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो. सततचे जंक फूड खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
High Cholesterol, High Cholesterol Disease
High Cholesterol, High Cholesterol DiseaseSaam Tv

High Cholesterol Symptoms :

बदलेली जीवनशैली, वातावरणातील बदल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो. सततचे जंक फूड खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. त्यामुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही.

हृदयाच्या आरोग्यासाठी (Health) कोलेस्टेरॉल नेहमीच घातक ठरते. अतिरिक्त चरबी आणि खराब कोलेस्टेरॉलची वाढ थांबवावी लागेल. या दोन्हींचा हृदयाच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. कोलेस्टेरॉल म्हणजे काय? याची लक्षणे (Symptoms) कोणती? जाणून घेऊया.

1. कोलेस्टेरॉल म्हणजे काय?

कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीरात यकृताद्वारे तयार केले जाते. हे पचनसंस्था, जीवनसत्त्व डी सारखे संप्रेरकांच्या निर्मितीसाठी अंत्यत आवश्यक आहे. शरीरात चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारचे असते. कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा लिपिड आहे. जो शरीराच्या आवश्यक कार्यांसाठी आवश्यक आहे. चरबीच्या कणांपासून बनलेले असल्याने ते रक्तात विरघळत नाही आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सहज पोहोचू शकते.

High Cholesterol, High Cholesterol Disease
Herbs For Hair : कोरड्या-रखरखीत केसांमुळे वैतागले आहात? हे ४ आयुर्वेदिक पदार्थ ठरतील फायदेशीर

2. वाढलेल्या कोलेस्टेरॉलची लक्षणे

1. जास्त घाम येणे

घाम येणे ही मोठी समस्या नसली तरी ही सामान्यपेक्षा जास्त होणे हे कोलेस्टेरॉल वाढल्याचे लक्षण आहे.

2. सतत पाय दुखणे

पाय सतत दुखत राहाणे हे देखील वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे. ही वेदना कायम होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

High Cholesterol, High Cholesterol Disease
Oily Skin Care : त्वचा सतत तेलकट होते? आहारात करा या सुपरफूडचा समावेश

3. पेटके येणे

शरीराच्या कोणत्याही भागात अचानक पेटके येणे हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे. हे पेटके पाय, नितंब, मांड्या आणि बोटांमध्ये जाणवतात. काही वेळा कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा येतो.

4. छातीत दुखणे

छातीत दुखण्याची समस्या बऱ्याचदा गॅसमुळे उद्भवते परंतु, काहीवेळा तो वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे देखील होतो. त्यामुळे छातीत दुखत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com