Gym Hygiene : जिममधील उपकरणांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया, वेळीच व्हा सावध

Bacteria Alert : जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळतात. योग्य स्वच्छता न राखल्यास त्वचेचे आजार, संसर्ग आणि इतर गंभीर आरोग्य धोके संभवतात. जिममध्ये स्वच्छता पाळणे आवश्यक.
Gym gym bacteria
Gym overtraining symptomssaam tv
Published On

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक फिटनेसला प्रचंड महत्व देत आहेत. योग्य आहारासोबत लोकांना योग्य फिटनेसचे महत्व सुद्धा कळलेले आहे. त्यामुळे लोक व्यायामाला जास्त प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत जिमला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिटनेससाठी लोक जिममधील उपकरणांचा वापर करतात. पण अलीकडील एका अभ्यासानुसार, जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळतात. इतकेच नाही तर जिममध्ये असणारा सुमारे ९० टक्के बॅक्टेरिया हा मानवी आरोग्यासाठी घातक असू शकतो.

सर्वात जास्त वापरले जाणारे उपकरण म्हणजे ट्रेडमिल. लोक त्यावर तासनतास धावतात आणि या काळात त्यांचा घाम मशीनवर पडतो. काही लोक टॉवेल मशीनच्या काठावर ठेवतात. ज्यामुळे घाण आणि बॅक्टेरिया अधिक प्रमाणात पसरतात. यामुळे त्वचेच्या समस्या, फंगल इन्फेक्शन तसेच न्यूमोनियासारखे आजार होण्याची शक्यता असते.

Gym gym bacteria
Sprouted Potatoes Risk : मोड आलेले बटाटे खाताय? आरोग्याला निर्माण होईल मोठा धोका, तज्ज्ञांचा इशारा

त्याचप्रमाणे, डंबेल्स हे जिममधील सर्वाधिक घाणेरड्या उपकरणांपैकी एक मानले जातात. दररोज अनेक लोक त्याचा वापर करतात आणि त्यामुळे विविध प्रकारचे बॅक्टेरिया त्यावर चिकटतात. काही बॅक्टेरिया अँटीबायोटिक असल्याने संक्रमणाचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे डंबेल्स वापरल्यानंतर हात नीट धुणे किंवा उपकरणे सॅनिटाइज करणे आवश्यक आहे. योगा मॅट्समध्येही मोठ्या प्रमाणात घाण आणि बॅक्टेरिया आढळतात. शरीराचा घाम आणि ओलावा थेट मॅटवर साचतो. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, जिममध्ये जाणाऱ्यांनी स्वतःची मॅट सोबत नेणे अधिक सुरक्षित ठरते.

पुल-अप बार आणि इतर उपकरणांमध्येही बॅक्टेरिया जास्त वाढतो. घाम, ओलावा आणि उष्णतेमुळे हे उपकरण संसर्गाचे ठिकाण बनतात. त्यामुळे जिममध्ये जाणाऱ्यांनी उपकरणे वापरल्यानंतर हात धुणे, हातमोजे घालणे, नेहमी स्वतःचा टॉवेल वापरणे आणि व्यायामानंतर घामाचे कपडे त्वरित बदलणे या स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे अत्यावश्यक आहे. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम जितका गरजेचा आहे, तितकीच उपकरणांची स्वच्छता राखणेही महत्वाचे आहे.

Gym gym bacteria
Bank Jobs 2025 : मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि २२,००० रुपये पगार मिळवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com