Health: मुंबईत HFMD विषाणूचा संसर्ग; वेदनादायी अल्सरचा मुलांना धोका

Health HFMD Virus: मुंबई शहरात HFMD विषाणूचा संसर्ग पसरलाय. या विषाणूचा मुलांना धोका आहे. संसर्गबाधिताला खूप ताप येतो.
Health: मुंबईत HFMD विषाणूचा संसर्ग; वेदनादायी अल्सरचा मुलांना धोका
HFMD virus
Published On

तुमच्या हात, पाय आणि तोंडावर पुरळ आले असतील तर तुमच्या चिमुरड्यांची काळजी घ्या.... कारण नव्या विषाणूने मुंबईला वेढा घातलाय. नेमका कोणता आहे हा विषाणू? त्याची लक्षणं काय आहेत? आणि त्यावर उपाय काय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

मुंबईला HFMD या विषाणूंनी वेढा घातलाय. या आजारांचा मोठा त्रास हा लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरीकांना होतोय. जर तुमच्या मुलांना किंवा घरातील वृद्धांना हातापायावर पुरळ येत असेल किंवा घसा खवखवत असेल तर HFMD चा धोका आहे. कारण मुंबईला सध्या HFMD या आजारानं वेढा घातलाय. लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक या आजाराची शिकार होतायेत. त्यामुळे सावध व्हा या आजाराची लक्षण काय आहेत ते नीट पहा.

या विषाणूची काय लक्षणं आहेत पाहूया

1. संसर्गबाधिताला खुप ताप येतो

2. हाता पायावर आणि तोंडावर पुरळ येतात

3. संसर्ग बाधितांचा घसा खवखवतो

आता तुम्हाला प्रश्न पड़ला असेल हा आजार पसरतो कसा तर तेही पहा.

HFMD हा विषाणू कसा पसरतो पाहूया.

1. हा विषाणू संसर्गजन्य

2. लाळेद्वारे संसर्ग पसरतो

3. नाक वाहत असल्यास संसर्गाचा धोका

4. शिंकेतून संसर्गाचा प्रसार

5. लहान मुलं आणि वृद्धांना अधिक धोका

HFMD या आजारानं मुंबईत डोकंवर काढलंय. तेव्हा या आजारांनं बाधित अनेक जण तुमच्या आजूबाजूला असतील तेव्हा या आजाराला दूर ठेवायचं असेल तर काय करावं ते देखील पाहूया.

HFMD पासून बचाव कसा करायचा?

1. नियमित हात स्वच्छ धुवा.

2. शक्य असेल तर सॅनिटायझर वापरा.

3. लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरचा सल्ला घ्या.

ताप आणि हातापायावर पुरळ आल्यानंतर शुल्लक समजू नका. कारण HFMD चा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालाय.. वेळीच उपचार केले नाहीत तर वेदनादायी अल्सरमध्ये बदल होण्याची शक्यता अधिक आहे. हा आजार प्राथमिक पातळीवर ओळखून तातड़ीनं योग्य उपचार घेऊन आपल्या चिमुरड्यांची आणि आपल्या वृद्ध पालकांची काळजी घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com