Two Wheeler Price: हिरो MotoCorp वाढणार बाईकच्या किमती; स्वस्तात दुचाकी हवी तर करा घाई

Hero Two wheelers: हिरो मोटोकॉर्पने आपल्या काही मॉडेल्स किमतींबद्दल मोठी माहिती उघड केली आहे.
Hero MotoCorp Two wheelers
Hero MotoCorp Two wheelersSaam Tv
Published On

Hero MotoCorp Price Hike:

दुचाकीमध्ये बहुतेकांच्या आवडीची कंपनी म्हणजे हिरो मोटोकॉर्प. आपल्यातील अनेकांकडे या कंपनीचे दुचाकी वाहन असेल.या कंपनीची दुचाकी घेण्याची इच्छा असेल तर हीव बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण कंपनी आपल्या बाईकच्या किमतीत वाढ करणार आहे. हिरो मोटोकॉर्प ३ ऑक्टोबर २०२३ पासून बाईकच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.(Latest Business News)

म्हणजेच जर तुम्हाला कमी किमतीत दुचाकी हवी असेल घाई करावी लागेल. कारण फक्त स्वस्तात बाईक घेण्यासाठी फक्त एक दिवस उरलाय. कंपनीने त्यांच्या निवडक बाईक आणि स्कूटरच्या किमती एक टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, उत्पादनाची स्पर्धात्मकता आणि स्थिती, महागाई दर, मार्जिन आणि बाजारातील हिस्सेमुळे किमतीत वाढ करण्यात आलीय.

यावर्षी हिरोनं ३ जुलैमध्ये आपल्या काही मॉडेल्सच्या किमतींमध्ये १.५ वाढ केली होती. दरम्यान सणासुदीच्या दिवसात वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. हीच गोष्ट घेरत कंपनीने आपल्या काही दुचाकीच्या मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकतेच करिज्मा XMR ची किमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

कंपनीने हिरो करिज्मा XMRला एका महिन्याआधी लॉन्च केले होते. या स्पोर्ट्स बाईकची किमत ७ हजार रुपयांनी वाढवण्यात आलीय. ऑक्टोबरमध्ये लेटेस्ट करिज्माची एक्स शोरूम किमत १.८० लाख रुपये राहणार आहे. दरम्यान हिरो मोटोकॉर्पच्या अनेक घटकांमुळे खर्च वाढू लागलाय. यामुळे दुचाकीच्या किमती वाढवण्यात येत आहेत. हिरोकडे भारतातील दुचाकींचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. यात १०० सीसी, पासून ते २१० सीसी पर्यंतच्या बाईक्स आहेत. यात काही स्कूटरचाही समावेश आहेत.

Hero MotoCorp Two wheelers
Hero Glamour 2023 : 125cc हिरो ग्लॅमर लॉन्च! स्टायलिश डिझाइनसह मायलेजही दमदार, किमत पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com