Heart Attack : तुम्हीही ६-७ तास झोप घेताय? कार्डिओलॉजिस्टने दिला थेट हार्ट अटॅकचा इशारा

Bad Sleep Cause Heart Attack : तुमच्या झोपेचे वेळापत्रक बिघडल्यामुळेही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढते. चांगल्या हृदयाच्या आरोग्यासाठी किती तास झोप घेणे गरजेचे आहे, जाणून घेऊयात.
Bad Sleep Cause Heart Attack
Heart AttackAI PHOTO
Published On
Summary

झोपेमुळे उद्भवतो हार्ट अटॅकचा धोका

७ तासापेक्षा कमी झोप आरोग्यास घातक

अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब वाढतो

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयाच्या समस्या असलेले रुग्ण वाढत आहे. आपल्या दैनंदिन जीवनाचा आपल्या हृदयावर चांगला वाईट परिणाम होत असतो. चांगल्या आरोग्यासाठी झोप पूर्ण होणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्ही दिवसातून सात तासांपेक्षा कमी झोपत असाल तर वेळीच सावध व्हा. तुम्हाला हृदयविकाराचा धोका वाढतो.

हृदयविकाराच्या रुग्णांवर डॉक्टरांनी केलेला अभ्यास

हृदयविकाराच्या रुग्णांवर डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की, ५५ टक्के रुग्ण दिवसातून सात तासांपेक्षा कमी झोपतात. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील रक्तदाब, दाह आणि तणावाशी संबंधित हार्मोन्समध्ये बदल होतो, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. ही स्थिती दीर्घकाळ टिकल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासह हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. पुरेशी झोप घेणे हा देखील निरोगी हृदयाच्या दिनचर्येचा एक आवश्यक भाग आहे.

हृदय तज्ज्ञांचे मत

कानपूरचे हृदयरोगतज्ञ डॉ. अमित कुमार यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या रुग्णांच्या अभ्यासात झोपेच्या सवयी तपासण्यात आल्या. ५५ टक्के रुग्ण दिवसातून सात तासांपेक्षा कमी झोप होते, ४५ टक्के रुग्ण सात ते नऊ तास झोपत होते आणि ३६ टक्के रुग्णांच्या झोपेत वारंवार व्यत्यय येत होता. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी ८ तासांची झोप पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

Bad Sleep Cause Heart Attack
Organ donation: दरवर्षी 4-5 लाखांना अवयव प्रत्यारोपणाची गरज; 10 टक्क्यांहून कमी रुग्णांना लाभ, रुग्णालयाचा जनजागृतीसाठी पुढाकार

हृदयरोगतज्ञ डॉ. अमित कुमार यांनी स्पष्ट केले की, हृदयरोग आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. खराब जीवनशैली, तणाव, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे तरुणांमध्येही याचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत, आपली दैनंदिन दिनचर्या सुधारणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com