

हार्ट अटॅक म्हटलं की तो फक्त वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे येतो असं सर्वांच्या मनात येतं. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हार्ट अटॅक येण्यामागे फक्त कोलेस्ट्रॉल कारणीभूत नाहीये. इतर अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.
डॉ. वुल्फसन यांनी याबाबत मत व्यक्त करताना सांगितलं की, हार्ट अटॅकमागे फक्त कोलेस्ट्रॉल नाही, तर त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची कारणं असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार शरीरातील सूज (inflammation), रक्तात तयार होणाऱ्या अनियमित गुठळ्या (clotting) आणि रक्ताभिसरणातील अडथळे हे घटक तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात. त्यामुळे केवळ कोलेस्ट्रॉलच्या आकड्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण हृदय आणि रक्तवाहिन्यांची कार्यपद्धती कशी आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.
डॉ. वुल्फसन यांच्या मते, नॅटोकिनेज आणि सेरापेप्टेस हे दोन्ही एन्झाइम्स हृदय आणि रक्ताभिसरण सिस्टीमला मदत करू शकतात.
काही संशोधनांच्या आधारे नॅटोकिनेज रक्तप्रवाह सुधारण्यास, रक्ताभिसरण संतुलित ठेवण्यास आणि रक्तदाबावर सकारात्मक परिणाम करण्यास मदत करू शकतो. तसंच तो पारंपरिक रक्त पातळ करणाऱ्या औषधांप्रमाणे थेट काम करत नाही तर शरीराच्या नैसर्गिक 'फायब्रिन तोडण्याच्या' प्रक्रियेला मदत करतो, असा संशोधकांचा दावा आहे.
सेरापेप्टेस हा एन्झाइम शरीरातील इन्फ्लामेशन निर्माण करणारे घटक कमी करण्यास मदत करू शकतो. यात खराब झालेले टिश्यू, अतिरिक्त फायब्रिन आणि सूज वाढवणारे प्रोटीन यांचा समावेश होतो, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात, असं तज्ज्ञ म्हणतात. सूज कमी झाली तर रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारू शकतं आणि एकूणच हृदयाचं आरोग्य चांगलं राहू शकतं, असा त्यांचा दावा आहे.
दोन्ही एन्झाइम्स एकत्र कसं काम करतात हे स्पष्ट करताना ते म्हणतात, नॅटोकिनेज रक्तातील फायब्रिन नियंत्रित करण्यास मदत करतो, तर सेरापेप्टेस सूज आणि खराब झालेले टिश्यू साफ करण्यास हातभार लावतो. त्यामुळे मिळून रक्तप्रवाह आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकतं.
डॉ. वुल्फसन यांनी स्पष्ट केलं की, आपल्या शरीराला ज्या घटकांची गरज आहे ते देणं याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हृदयाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारच्या उपायांचा विचार करू शकतात. मात्र कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.