

झोपण्याची स्थिती कशी असली पाहिजे याबाबतचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एआय व्हिडिओंपासून ते व्यक्तींनी शेअर केलेल्या व्हिडिओंपर्यंत, विशिष्ट झोपण्याच्या स्थिती चुकीच्या असल्याचं सांगणारे विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. अशातच आजकाल इन्स्टाग्रामवर असे अनेक व्हिडिओ दिसतात ज्यामध्ये पोटावर झोपणं हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं असा दावा केला जातोय.
असाच एक दावा 'ओप्लसहार्टसेंटर' (oplusheartcentre) या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या एका पोस्टमध्ये करण्यात आलाय. ज्यामध्ये नमूद केलंय की, पोटावर झोपल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
या व्हिडिओमध्ये असंही म्हटलंय की, विशिष्ट स्थितीत झोपल्याने हार्ट संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे झोपण्याच्या सवयींचा हृदयावर खरोखरच परिणाम होतो का, हे जाणून घेऊया. याविषयी तज्ज्ञांचं काय मत आहे ते जाणून घेऊया.
'ओप्लसहार्टसेंटर' (oplusheartcentre) नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करण्यात आलीये. या पोस्टमध्ये, एका तरुणाने दावा केलाय की, पोटावर झोपल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. जर तुम्हाला आधीपासूनच हार्टच्या समस्या असतील तर हा धोका अधिकच वाढतो.
व्हिडिओमध्ये असंही म्हटलंय की, जर तुम्हाला आधीपासूनच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असेल, तर डाव्या कुशीवर झोपल्याने तुमच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. याबाबत हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्समधील हृदयरोगतज्ञ डॉ. चंद्र मौली एस. मंत्रवादी यांनी द हेल्द साईटला माहिती दिलीये.
पोटावर झोपल्याने छाती आणि पोटावर दाब येऊ शकतो. ज्यामुळे फुफ्फुसांच्या प्रसरणावर आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. यामुळे हृदयाला थोडं जास्त काम करावं लागू शकतं. विशेषतः लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, स्लीप ॲप्निया किंवा सीओपीडी यांसारखे आजार असलेल्या लोकांना याचा त्रास अधिक होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.