Heart Attack : हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका का वाढतोय ? सिनेसृष्टीला याचा विळखा का ?

सतत तरुणांपासून वयोवृध्दापर्यंत हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसत आहे.
Heart Attack
Heart AttackSaam Tv
Published On

Heart Attack : सध्या बॉलिवूडला हृदयविकाराचे व्यसन जडलेले आहे. जीममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका येणे हे काही सामान्य बाब नाही. सतत तरुणांपासून वयोवृध्दापर्यंत हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसत आहे. अचानक येणारा हृदयविकाराचा झटका हा हृदयविकाराच्या झटक्यासारखा नसतो, जेव्हा हृदयाच्या एखाद्या भागामध्ये रक्त प्रवाह न झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ताबडतोब उपचार न केल्यास, अचानक हृदयविकाराचा झटक्याचे मृत्यूत रुपांतर होऊ शकते.

हिवाळ्यात सर्दी, ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. पण तुम्हाला माहित आहे का की, थंडीत या आजारांसोबतच (Disease) हृदयविकाराचा धोकाही खूप वाढतो. म्हणूनच या ऋतूत हृदयाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हृदयविकाराचा झटका अधिक कोणाला होतो आणि तुम्ही हृदयविकाराच्या जोखमीपासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता हे सांगणार आहोत.

Heart Attack
Heart Attack : महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी मिळतात 'हे' संकेत, अशावेळी काय कराल ?

या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो

युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक लठ्ठ आहेत किंवा ज्यांचे वजन जास्त वाढले आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनीही थंडीत स्वतःची अधिक काळजी घ्यावी कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची शक्यता ३० पटीने वाढते.

सकाळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो

  • हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे रक्तदाब वाढतो. उच्च बीपीमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

  • याशिवाय थंडीत शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते.

  • हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सकाळी सर्वात जास्त असते कारण यावेळी तापमान खूप कमी राहते.

  • शरीराचे तापमान समान करण्यासाठी, रक्तदाब वाढतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

Heart Attack
Heart Attack : कार्डियोलॉजिस्‍ट्सच्‍या मते, 'या' कारणांमुळे वाढतोय तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका

हृदयाच्या आरोग्याची अशी काळजी घ्या

  • हिवाळ्यात सकाळी फिरायला जाऊ नका. फेरफटका मारायचा असेल तर ९ वाजल्यानंतर निघा. वातावरण थंड असल्यामुळे आपल्याला अधिक त्रास होऊ शकतो.

  • जेवणात शक्य तितके कमी मीठ खावे. व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून मीठ कमी खा. याशिवाय व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com