Heart Attack चा धोका टळणार! एक इंजेक्शन आणि हार्ट अटॅकपासून मुक्ती, हार्टपेशंट्सना आता औषधाची गरज नाही

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकचं नाव काढलं तर अनेकांना धडकी भरते... मात्र आता फक्त एक इंजेक्शन हार्ट अटॅकचा धोका टाळणार आहे....ते नेमकं कसं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Heart Attack Treatment
Heart Attack Treatmentx
Published On

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलयं... हद्यविकारांच्या भीतीनं तुमची चिंता वाढलीय. तर आता काळजी करायची गरज नाहीय. कारण शरीरातील सायलेंट किलर आणि हद्यविकारांना आमंत्रण देणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलवर आता सहज नियंत्रण मिळवता येणार आहे. एका इंजेक्शनच्या सहाय्यानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल झटपट कमी करता येणार आहे. BBC सायन्स फोक्सच्या रिपोर्टनुसार, स्टॅटिन्स सारखी औषधही कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. मात्र ती औषध दररोज घ्यावी लागतात. आता शास्त्रज्ञांच्या एका संशोधनामुळे VERVE-102 नावाचं एक इंजेक्शन शरीरातील वाईट कोलस्ट्रॉल कमी करू शकते. ते कसं पाहूयात...

हार्ट अटॅकचा धोका टळणार

- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी VERVE-102 औषधाची निर्मिती

- VERVE-102 औषधाची 14 रुग्णांवर चाचणी करण्यात आलीय

- जास्त इंजेक्शनचे डोस घेणाऱ्या रुग्णाच्या वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये 69% घट

- मध्यम डोस घेणाऱ्या रुग्णांच्या कोलेस्ट्रॉलमध्ये सरासरी 21% ते 53% घट

- औषध शरीरातील PCSK9 नावाच्या जनुकावर नियंत्रण ठेवते

- जनुकावरील नियंत्रणानं रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

Heart Attack Treatment
Pune : पुण्यातील शाळा, विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी, पोलिसांकडून महत्त्वाचं पाऊल

VERVE-102 या औषधांच्या अजूनही काही चाचण्या होणं बाकी आहे. या चाचण्यांमध्ये ते सर्वच प्रकारच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचं सिद्ध झाल्यास हार्टपेशंटस साठी हे इंजेक्शन म्हणजे वरदानच ठरेल.

Heart Attack Treatment
आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचे खास नियोजन, पंढरपूर आणि मिरजसाठी चालवणार 80 आषाढी विशेष गाड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com