Heart Attack: हार्ट अटॅक कधीही येऊ शकतो, ही ५ लक्षणं वेळोवेळी देतात संकेत, दुर्लक्ष करून चालणार नाही!

Heart Attack Early Warning Signs : हार्ट अटॅक अचानक येऊ शकतो, पण शरीर आधी संकेत देत असते. दम लागणे, थकवा, हृदयाची धडधड आणि झोपेच्या समस्या दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते.
Heart Attack Early Warning Signs
Heart Health Awarenessgoogle
Published On

हार्ट अटॅक ही अत्यंत गंभीर समस्या आहे. याची लक्षणे काही सांगता येत नाहीत. या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना पाहायला मिळत आहे. हा आजार ओळखता येऊ शकतो. त्यासाठी काही सूक्ष्म संकेतांकडे लक्ष दिले पाहिजे. कारण कोणत्याही गंभीर आजारापुर्वी शरीर वेळोवेळी संकेत देत असते. याकडे लक्ष दिल्याने तुम्ही हार्ट अटॅकसारखा गंभीर आजार सहज टाळू शकता.

ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांनी हे मत व्यक्त केले आहे. आशलोक हॉस्पिटलचे सहसंस्थापक आणि कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट असलेल्या डॉ. चोप्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे हृदयाशी संबंधित काही ‘सायलेंट’ इशारे सांगितले आहेत, जे बरेच लोक सहजपणे दुर्लक्षित करतात.

Heart Attack Early Warning Signs
Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

जर तुम्ही रोज ठरलेली कामे करत असाल आणि तुम्हाला अचानक दम लागत असेल छातीत श्वास घेताना कळा जाणवत असतील हा त्यातील एक महत्त्वाचा इशारा ठरू शकतो. ही समस्या काही क्षणांपुरतीच असते. पण महत्वाची असते. जिने चढताना, चालताना किंवा अगदी झोपेत असतानाही धाप लागणे हे हृदय पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त पंप करू शकत नसल्याचे लक्षण असू शकते.

याशिवाय सतत थकवा जाणवणे हेही हृदयाकडे लक्ष देण्याचे संकेत असू शकतात. पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा न वाटणे, साधी कामे करतानाही प्रचंड थकवा येणे यामागे हृदयाची कार्यक्षमता कमी होणे कारणीभूत असू शकते. हृदय योग्य प्रकारे रक्त पंप न केल्यास शरीरातील ऊर्जेची पातळी घसरते, असे तज्ज्ञ सांगतात.

हृदयाच्या ठोक्यांमध्ये अचानक बदल जाणवणे, ठोके चुकणे, धडधड वाढणे किंवा अनियमित ठोके जाणवणे हे देखील दुर्लक्षित करू नयेत. असे बदल इतर लक्षणांसोबत जाणवत असतील, तर ते हृदयावर ताण असल्याचे संकेत देऊ शकतात. अनेक वेळा लोक हे तणाव किंवा थकव्यामुळे झाले असे समजून दुर्लक्ष करतात, पण त्यामागे गंभीर कारण असू शकते.

झोपेशी संबंधित समस्या देखील हृदयाच्या आरोग्याशी जोडलेल्या असू शकतात. वारंवार झोपेतून जाग येणे, झोपताना गुदमरल्यासारखे वाटणे किंवा सपाट झोपता न येणे हे हृदयावर अतिरिक्त ताण असल्याचे दर्शवू शकते. दीर्घकाळ अशी अवस्था राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.

Heart Attack Early Warning Signs
Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक...अत्यंत धोकादायक आणि न समजून येणारी लक्षणं, काय आहेत जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com