Heart Attack in Garba : गरबा खेळताना तुम्हालाही येऊ शकतो हार्टअटॅक; बचावासाठी 'या' स्टेप्स नक्की फॉलो करा

Health Tips in Garba : गरबा खेळताना व्यक्तीला हार्टअटॅक येऊ शकतो. तो टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Health Tips in Garba
Heart Attack in Garba Saam TV
Published On

गरबा खेळताना बाहेर मैदानात किंवा रस्त्यावर वाहनांचा धूर, धूळ आणि प्रदूषण असतं. त्यामुळे अशा वातावरणात जोरजोरात उड्या मारून खेळताना व्यक्ती घामाघूम होतात. दमतात, थकवा जाणवतो, त्यात जर बीपी कमी जास्त झाल्यास व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे आज गरबा खेळताना आरोग्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.

Health Tips in Garba
Garba Song Released: PM नरेंद्र मोदींनी लिहिलं गरब्याचं गाणं; नवरात्रीआधीच म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित, एकदा पाहाच!

मादक पदार्थांचे सेवन

गरबा हा एक उत्साहाचा खेळ आणि डान्सचा अनोखा प्रकार आहे. गरबा खेळताना काही जण मादक पदार्थांचे सेवन करतात. मात्र मादक पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. दारू, सिगारेट आणि गुटखा असे पदार्थ खात गरबा खेळल्याने याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो. तसेच याने हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते.

व्यायाम करा

गरबा खेळण्यासाठी जाण्याआधी व्यायाम करा. बऱ्याच व्यक्ती दिवसभर एकाच जागी बसून काम करतात. त्यामुळे शरीराला मेहनतीची सवय नसते. अचानक गरबा खेळल्याने हृदयाच्या नसांवर त्याचा ताण येतो. त्यामुळे देखील काही व्यक्तींना हार्टअटॅक येण्याची शक्यता असते.

भरपूर पाणी प्या

निरोगी राहण्यासाठी पाणी जास्तीत पिणे गरजेचं आहे. पाणीचं आपल्याला शरीराला निरोगी ठेवते. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी जाण्याआधी भरपूर आणि पोटभर पाणी प्या. पाणी जास्त पिल्याने पोटात गॅस होत नाही आणि आपल्या हृदयावर सुद्धा ताण येत नाही. नवरात्रीत अनेक व्यक्तींचा उपवास असतो. उपवासात व्यक्ती तेलकट आणि खिचडी आणि तळलेले पदार्थ खातात. त्यामुळे शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते. पाणी न पिल्यास शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा.

Health Tips in Garba
Garba In Train: मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांनी खेळला मनसोक्त गरबा; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com