हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशरच्या समस्या अनेक व्यक्तींना उद्भवतात. रक्त दाब कमी जास्त होत असल्यास याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो. त्रास जास्त असल्याने थेट आपल्याला हृदय विकाराचे झटके सुद्धा येताता. तसेच संबंधित व्यक्तीला स्ट्रोक आणि किडनीशी संबंधित त्रास सुद्धा वाढू शकतो.
सध्या प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बदलली आहे. व्यक्ती मोठ मोठी स्वप्न पाहत असल्याने ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील तितकीच घेत आहे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात जेवणाच्या वेळा चुकतात. तसेच व्यक्ती हेल्दी जेवण जेवण्याऐवजी व्यक्ती फास्टफूड खाण्याकडे लक्ष देतात. त्यामुळे आरोग्यावर याचा परिणाम होतो. ब्लड प्रेशरचा धोका कमी व्हावा यासाठी आम्ही आरोग्याच्या काही खास टिप्स आणल्या आहेत.
कामाचा तणाव प्रत्येक व्यक्तीला जास्त वाटतो. तणावामुळे सुद्धा ब्लड प्रेशर हळूहळू वाढत जातो. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी सर्वात आधी सकाळी लवकर आणि रोज ठरलेल्या एकाच वेळेत उठले पाहिजे. सकाळी ठरलेल्या वेळेत उठल्याने तुमचा स्ट्रेस कमी होईल.
काही व्यक्तींना झोपेतून उठल्यावर लगेचच बेट टी किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र यामुळे आपल्या शरीरात डिहायड्रेशन होतं. तसेच आपली पचन क्रिया बिघडते. त्यामुळे असे होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे पोट देखील साफ देते. तसेच सकाळी सकाळी पहिल्यांदा शरीरात पाणी गेल्याने आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.
दररोज सकाळी व्यायाम करण्यास सुरूवात करा. त्यासाठी आधी १५० मिनिटे फास्ट चालण्यास सुरुवात करा. तुम्ही यासह सायकलिंग, स्विमिंग असे व्यायाम सुद्धा करू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या सोईनुसार तुम्ही जीममध्ये देखील जाऊ शकता.
ब्रेकफास्टमध्ये पोहे, उपमा, थालिपीठ, विविध पळे यांचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे आपलं पोट सकाळी सकाळी भरलेलं राहतं. शिवाय आरोग्यावर सुद्धा याचा चांगला परिणाम होतो. पोट भरलेलं असल्याने अॅसिडीटी आणि जळजळ अशा समस्या उद्भवत नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.