Blood Group नुसार ठरवा तुमचा Diet Plan; नेहमी राहाल हेल्दी आणि फिट

Health News: प्रत्येकाने रक्तगटानुसार आहार करायला हवा. त्यामुळे शरीर निरोगी राहते आणि वजनदेखील नियंत्रणात राहते. तसेच मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगले राहते.
Blood Group
Blood Group Saam Tv
Published On

Blood Group Diet:

बदलती जीवशैली, वातावरणाचा आणि जेवणाचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे रोज सकस आणि पौष्टिक आहार करावा. पौष्टिक अन्न खालल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सृदृढ राहते. तसेच त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. तसेच आपण जे अन्नपदार्थ खातो त्याचा संबंध रक्तगटाशी असतो. वेगवेगळे रक्तगट असलेल्या लोकांनी विशिष्ट आहार करावा.

रक्तगटानुसार आहार

प्रत्येकाने रक्तगटानुसार आहार करायला हवा. त्यामुळे शरीर निरोगी राहते आणि वजनदेखील नियंत्रणात राहते. त्यामुळे मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगले राहते. सकस आहारासोबतच तुम्ही व्यायाम व्यायाम करायला हवा.

o ब्लड ग्रुप

o ब्लड ग्रुप असलेल्या लोकांनी प्रथिनेयुक्त पदार्थ खावेत. त्यांनी आहारात मांस, मासे, हिरव्या भाजा आणि फळे खावेत. तुम्ही तुमच्या आहारात धान्य, शेंगा याचा समावेश करा. ओ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांसाठी मासे, ब्रोकोली, पालक, ऑलिव्ह ऑइल हे पदार्थ वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. ओ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांनी गहू, कॉर्न आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळावे.

A ब्लड ग्रुप

A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांनी आहारात फळे, भाज्या, सीफूड हे पदार्थ खावेत. त्यांनी आहारात मांस खाणे टाळावे. वजन कमी करण्यासाठी A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांनी भाज्या, अननस, ऑलिव्ह ऑइल या पदार्थांचा समावेश करावा. A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांनी दुधाचे पदार्थ, मक्का आणि राजमा खाऊ नये.

Blood Group
Glowing Skin : आंघोळीपूर्वी दूध चेहऱ्याला लावा, त्वचा होईल मुलायम आणि चमकदार

B ब्लड ग्रुप

B ब्लड ग्रुप असलेल्या लोकांनी मांस, फळे, दुग्धजन्य पदार्थ, सीफूड आणि धान्ये पदार्थ खावेत. B ब्लड ग्रुप असलेल्या लोकांनी वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या, अंडी या पदार्थांचा समावेश आहारात करावा. या लोकांनी आहारात मांस, कॉर्न, शेंगदाणे आणि गहू खाणे टाळावे.

AB ब्लड ग्रुप

AB रक्तगट असलेल्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थ, मासे, धान्ये, फळे आणि भाज्या खाव्यात. वजन कमी करण्यासाठी सी फूड, हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.

Blood Group
Morning Routine Tips : सकाळी उठल्याबरोबर चेहरा धुवावा का? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com