Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Health Tips For Strong Bones : सांधे दुखणे या समस्यांपासून दूर जाण्यासाठी आणि शरीर पोलादी बनवण्यासाठी आहारात काही ठरावीक पदार्थांचा समावेश असणे फार गरजेचे आहे.
Strong Bones
Strong BonesSaam TV

शरीरातील प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीची श्रीमंती म्हणजे त्याचे संपूर्ण अवयव आहेत. अनेक व्यक्तींना डोळे नसतात. काहींना हात-पाय देखील नसतात. मात्र तरीही ते आपल्या आयुष्याशी दोन हात करत जगत असतात. त्यामुळे आपण आपल्या अवयवांची निट काळजी घेतली पाहिजे.

Strong Bones
Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

वयोमानानुसार अनेक व्यक्तींना सांधेदुखीच्या समस्या उद्भवतात. मात्र सध्या तरुण मुलं आणि मुलींना देखील हाडे दुखणे, सांधे दुखणे या समस्या जाणवतात. या सर्व समस्यांपासून दूर जाण्यासाठी आणि शरीर पोलादी बनवण्यासाठी आहारात काही ठरावीक पदार्थांचा समावेश असणे फार गरजेचे आहे.

डेअरी प्रोडक्ट

कॅल्शिअमसाठी डेअरी प्रोडक्टचे सेवन केले पाहिजे. कारण डेअरी प्रोडक्टमध्ये खनिज असते ज्याने आपल्या शरीराला ताकत मिळते आणि आपली हाडे मजबूत होतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज व्यक्ती आहारात नियमीतपणे डेअरी प्रोडक्टचे सेवन करतात त्यांना कधीच फॅक्चर होण्याची समस्या येत नाही.

पालेभाज्या

आहारात पालेभाज्या फार महत्वाच्या आहेत. मात्र अनेक घरांमध्ये पालेभाजी निवडताना फार वेळ लागतो अशी कारणे सांगत ती बनवणे टाळतात. पालेभाज्यामध्ये व्हिटॅमीन आणि आयर्न देखील जास्ता प्रमाणात असते. त्याने आपल्या शरीराला उर्जा मिळते. पालक, मेथी, कोबी, शेपू या भाज्यांचे आठवड्यातून एकदा तरी सेवन करावे.

अंडे

अंड्यांमध्ये व्हिटॅमीन डी असते. व्हिटॅमीन डी आपल्या हाडांसाठी फार महत्वाचे आहे. त्यामुळे दररोज याचे सेवन केल्याने शरीरातील मासपेशी मजबूत होतात. तसेच तुम्ही विविध आजारांपासून दूर राहता. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मोठ्याप्रमाणात वाढते.

Strong Bones
Stale Food Disadvantages : शिळं जेवण खाल्ल्याने तुम्हाला होतील 'हे' गंभीर आजार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com