Bike Riding Side Effects : सतत बाईक चालवत असाल, तर आरोग्यावर होतो गंभीर परिणाम; वाचा समस्या आणि उपाय

Health Tips : दुचाकीच्या प्रवासाने काही काळानंतर तुमच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज बाईक चालवण्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय काय आहेत.
Health Tips
Bike Riding Side EffectsSaam TV

सध्या प्रत्येक व्यक्तीकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. चारचाकीने प्रवास करताना जास्त त्रास होत नाही, मात्र दुचाकीच्या प्रवासाने काही काळानंतर तुमच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज बाईक चालवण्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय काय आहेत. त्याचीच माहिती जाणून घेऊ.

Health Tips
Health Tips: झोपेतून उठल्यानंतर उलटी- मळमळ सारखं होतंय, पाण्यात 'हा' पदार्थ टाकून प्या

हाडे कमजोर होतात

जास्तवेळ बाईक चालवल्याने त्या व्यक्तीच्या मांड्या आणि कमरेत दुखू लागतं. काही व्यक्तींना तर तासंतास बाईक चालवल्याने पायात क्रॅम्प देखील येतात. या समस्यांमुळे काही काळाने हाडांवर देखील त्याचा परिणाम होतो.

गुडघा किंवा मणक्यात गॅप

रस्त्यावर मुंबईसारख्या शहरात नेहमी खड्डे पाहायला मिळतात. खड्डे असल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दुचाकी चालवताना बाईक सतत वर खाली होत राहते. त्याचा पूर्ण परिणाम आपल्या गुढग्यांवर आणि कमरेवर होत असतो. यामुळे हाडांमधील गॅप आणखी वाढतो.

अशी घ्या काळजी

दुचाकी चालवताना पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत. पहिलेतर हेल्मेट शिवाय दुचाकी चालवू नका. त्यानंतर कंबरेला, गुडघ्याला सेफ्टे बेल्ट लावा. त्याने अवयवांना आणि हाडांना आधार मिळतो.

जर तुम्ही ३ ते ४ तासांचा प्रवास करत असाल तर अशावेळी ब्रेक घेणं गरजेचं आहे. दर १ तास किंवा अर्ध्या तासाने ब्रेक घेत राहा. ब्रेक घेतल्याने आपल्याला थकवा आल्यास तो दूर करता येतो. त्रास होत असताना प्रवास केला तर अपघात होण्याची शक्यता असते.

Health Tips
Health Tips: झोपेतून उठल्यानंतर उलटी- मळमळ सारखं होतंय, पाण्यात 'हा' पदार्थ टाकून प्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com