Womens Health Risks: दारूचं सेवन करणाऱ्या महिलांना होऊ शकतात 'हे' जीवघेणे आजार

Cancer Risk: पुरुष दारू पितात ही संकल्पना सगळ्यांनाच माहीत आहे. पण स्त्रीया दारू पितात हे ऐकायला फारसं चांगल वाटत नाही. पण सध्याची जीवनशैली पाहता महिलासुद्धा या व्यसनाच्या आहारी जावू लागल्या आहेत.
 Womens Health Risks: दारूचं सेवन करणाऱ्या महिलांना होऊ शकतात  'हे' जीवघेणे आजार
Published On

पुरुष दारू पितात ही संकल्पना सगळ्यांनाच माहीत आहे. पण स्त्रीया दारू पितात हे ऐकायला फारसं चांगल वाटत नाही. पण सध्याची जीवनशैली पाहता महिलासुद्धा या व्यसनाच्या आहारी जावू लागल्या आहेत. यामुळे महिलांच्या शरीरावरही सगळ्यात जास्त प्रमाणात फरक पडतो. महिलांना जास्त दारू प्यायल्याने लिवर कॅन्सर, ह्दयरोग, ब्रेन स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. अशा गंभीर आजारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

 Womens Health Risks: दारूचं सेवन करणाऱ्या महिलांना होऊ शकतात  'हे' जीवघेणे आजार
Junk Food Effects: जंक फूड खाण्याचा तुमच्या मेंदूवर होतो परिणाम; सत्य ऐकून व्हाल चकीत!

दारूचे सेवन केल्याने महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे लिवर कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर, वॉइस कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयासंबंधीत समस्या किंवा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यात ज्या महिला नियमित दारूचे सेवन करतात त्यांना या समस्यांना सामोरं जावं लागतं.

अन्ननलिकेचा कॅन्सर Esophageal cancer

दारु सेवन केल्याने अन्ननलिकेद्वारे ती शरीरात जाते. यामुळे तुम्हाला अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची आणि वाढल्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

कोलन कॅन्सर (Colon cancer)

तुम्ही जर नियमित दारू पित असाल तर तुम्हाला कोलन कॅन्सर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

लिवर कॅन्सर

दारूचे सेवन करण्याऱ्यांना मुख्यत: लिवर कॅन्सर होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. या आजार जीवघेणा ठरतो.

ह्दयरोग

हाय बीपी आणि ह्दयरोगमध्ये दारू खूप दोषी ठरते. तुम्ही अती प्रमाणात दारू सेवन करत असाल तर तुम्हाला डायबिटीज, हाय बीपी, ह्दयरोग यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

 Womens Health Risks: दारूचं सेवन करणाऱ्या महिलांना होऊ शकतात  'हे' जीवघेणे आजार
Trending Suits For Women: कोणत्या फेस्टीवलमध्ये कोणता सुट वापरायचा? ट्रेंडी लुक मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्रेन स्ट्रोक

जास्त दारू सेवन केल्याने मेंदूवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

 Womens Health Risks: दारूचं सेवन करणाऱ्या महिलांना होऊ शकतात  'हे' जीवघेणे आजार
Sleeping On The Floor: फरशीवर झोपल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com