
प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपली पर्सनॅलिटी चांगली असावी. सण समारंभात आपण उठून दिसावं. त्यासाठी महिला खरेदी करतात. हा विषय त्यांच्या कितीही जिव्हाळ्याचा असला तरी, त्यांना योग्य कपडे किंवा सध्याचा चालणारा ट्रेंड ओळखता आला पाहिजे. जेणे करून तुम्ही चारचौघात उठावदार आणि उत्तम व्यक्तीमत्व असलेली व्यक्ती ठराल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम पर्सनॅलिटी तयार करण्यासाठी जास्त पैसे खर्च खर्च करावे लागतात असं नाही.
आजच्या लेखात आपण महिलांचे ट्रेंडी सुट्स पाहणार आहोत. त्याचसोबत त्यांना उठवदार आणि आकर्षक दिसण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करावा? याचा सल्ला सुद्धा देणार आहोत.
महिला सगळ्यात जास्त नातेवाईकांच्या घरी लहान समारंभाना जात असतात. अशा वेळेस त्यांच्यावर गुलाबी रंग सगळ्यात आकर्षित दिसू शकतो. तसेच तुम्ही अशा समारंभांना ओढणी नसलेले ड्रेस सुट परिधान करू शकता. याने तुमच्याकडे लोक आकर्षित होतील. तसेच तुम्ही सिंपल लुक आणि मोठ्या झुमक्यांचा वापर करू शकता. या सुटला 'काफ्तान स्टाइल सूट' म्हणतात.
महिलांना वेगवेगळ्या हॉलेट्समध्ये जायला प्रचंड आवडतं. त्यावेळेस तुम्हाला 'मोनोक्रोम लुक' परफेक्ट आणि हटके ठरू शकतो. तुम्ही हवेच्या ठिकाणी, फिरायला जाताना अशा सुटचा वापर करू शकता. यात तुम्ही ब्राईट कलर आणि दोन मिक्स कलरचा वापर करू शकता. हे कॉन्ट्रास्ट कलर तुम्हाला नक्कीच आकर्षक करतील. तुम्ही यात डार्क कानातल्यांचा वापर करू शकता.
मिरर वर्क सूट 2025 मध्ये लग्नासारख्या विशेष मोठ्या कार्यक्रमात वापरताना पाहिलेला दिसतो. हा लुक मुलींसाठी सगळ्यात सुंदर ठरू शकतो. यात तुम्ही पेस्टल कलरचा वापर करू शकता. यामध्ये नेकलाइन हेवी वर्कने सजवलेली असते. हा सुट तुम्हाला कॅरी करायला अवघड नसेल.
इतर कार्यक्रमांमध्ये तुम्ही न्युट्रल शेडचा वापर करत असाल तर तुमची पर्सनॅलिटी तिथे जास्त उठावदार दिसते. शक्यतो हे शेट निवडाता तुम्ही तुमच्या सुटवर जितकी साधी डिजाईन ठेवाल तितके आकर्षित व्हाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.