Sleeping On The Floor: फरशीवर झोपल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Benefits Sleeping On The Floor: आजकाल फरशीवर झोपायला लोक फार कंटाळतात. काहींना ते आवडतचं नाही. झोपण्यासाठी लोक कित्तेक महागडे सोफे, पलंग विकत आणत असतात.
Sleeping On The Floor: फरशीवर झोपल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
Sleeping on the Floorgoogle
Published On

आजकाल फरशीवर झोपायला लोक फार कंटाळतात. काहींना ते आवडतचं नाही. झोपण्यासाठी लोक कित्तेक महागडे सोफे, पलंग विकत आणत असतात. पण यामुळे शरीराला काही फायदा होत नाही. तुम्ही जितकं जमिनीवर किंवा फरशीवर झोपाल तितका तुम्हाला फायदा होईल. फार पुर्वीपासून लोकं फरशीवर झोपत आले आहेत. फरशीवर झोपल्याने पाठीला खूप फायदा होतो. असेच अनेक फायदे आपण जाणून घेणार आहोत.

Sleeping On The Floor: फरशीवर झोपल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
March Calendar: मार्च 2025 मध्ये येणारे प्रमुख सण व तिथी; एकादशी, पाडवा, होळी आणि अमावस्या कधी?

फरशीवर झोपण्याचे फायदे (Benefits of sleeping on floor)

तुम्ही सलग दोन ते तीन दिवस फरशीवर झोपलात तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा तुमच्या मणक्याला होईल. तुमचा थकवा कमी होण्यास तुम्हाला मदत होईल. तुम्ही जर जास्त काळ बसून काम करत असाल तर तुम्हाला फरशीवर झोपल्याने प्रचंड फायदा होईल. तसेच डोक्याचा ताण सुद्धा कमी होईल.

नेशनल इंस्टीट्युट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर एंड स्ट्रोकच्या मते, पाठीवर झोपल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. ते फायदे तुम्हाला बेडवर मिळू शकत नाहीत. तर बेडवर झोपल्याने तुमचं शरीर आकडलं जावू शकतं. हेच तुम्ही फरशीवर झोपलात तर तुमच्या हाडांना सरळ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे बेडवर शक्य होईल तितके कमी झोपा असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

फरशीवर झोपल्याने शरीराला नुकसान होतं का?

ज्या व्यक्तींना वाताचा त्रास असतो त्यांनी फरशीवर झोपणं टाळलं पाहिजे. तसेच अशा रुग्णांनी थंड पाण्यात किंवा फरशीवर झोपणं टाळलं पाहिजे. तसेच फरशीवर झोपणाऱ्यांना झोपेचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यांना फरशीवर झोपल्याने कमी झोपेचा त्रास होऊ शकतो. तसेच सांधे दुखीच्या त्रासाला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. विशेषत: कंबर आणि खांद्याच्या सांध्यामध्ये वेदना होऊ शकतात.

फरशीवर झोपताना या गोष्टी लक्षात ठेवाच

थेट फरशीवर झोपू नका. तिथे चटई आणि कार्पेटचा वापर करा. तसेच मऊ पांघरुणाचा सुद्धा समावेश करा.

फरशीवर झोपताना खूप उंच उशा डोक्याखाली ठेवू नका.

फरशीवर झोपताना तुम्हाला योग्य वाटेल अशा स्थितीतच झोपा.

जर तुम्हाला फरशीवर झोपल्याने अस्वस्थता जाणवत असेल किंवा झोप लागत नसेल तर तुम्ही सोफ्यावर झोपा.

Sleeping On The Floor: फरशीवर झोपल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
Junk Food Effects: जंक फूड खाण्याचा तुमच्या मेंदूवर होतो परिणाम; सत्य ऐकून व्हाल चकीत!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com