Health Tips: शिळा भात खाल तर आजारी पडाल? भातावर जंतूंचा जथ्था? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

Germs On Stale Rice: तुम्ही शिळं अन्न खात असाल तर सावध व्हा. कारण, तुम्ही खात असलेल्या शिळ्या भातात जंतू असतात. तसा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.शिळा भात, अन्नपदार्थ अनेकजण खातात. त्यामुळे याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Health Tips
Germs On Stale Ricesaam tv
Published On

शिळा भात तुम्ही खात असाल तर हा व्हिडिओ पाहा. शिळ्या भाताच्या शितावर किती जंतू असतात हे पाहा. फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळा भाताचं एक शित चिमट्याने उचललं. नंतर ते शित काचपट्टीवर घेऊन त्यावर पाण्याचा एक थेंब टाकतो. नंतर हा पाण्याचा थेंब तो मायक्रोस्कोपखाली पाहतो. त्यावेळेस यामध्ये अनेक जंतू वळवळ करताना दिसत आहेत.

एका शितावर एवढे जंतू असतील तर तुम्ही खात असलेल्या शिळ्या भातात किती जंतू असतात याचा विचार न केलेलाच बरा. कारण, बरेच जण रात्री राहिलेला भात सकाळी खातात आणि हे जर खरं असेल तर अनेकांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

Health Tips
Cancer Medicine : कॅन्सरग्रस्तांसाठी मोठा दिलासा; जीवघेण्या कॅन्सरचा 9 दिवसात खात्मा? पाहा व्हिडिओ

व्हायरल सत्य आणि साम इन्व्हिस्टिगेशन

शिळा भात किंवा अन्न खाल्ले तर पोटाचे आजार होतात

शिळ्या अन्नामधील बॅक्टेरिया त्रासदायक ठरतात

शिळा भातच नव्हे तर अन्नही शिळं खाऊ नये

शिळं अन्न खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते

शिळे अन्न खाण्यापेक्षा ताजे अन्न खावेत

शक्यतो लागेल तेवढंच अन्न बनवायला हवं.फ्रीजमध्ये शिळं अन्न ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही शिळं अन्न खाणं टाळा...आमच्या पडताळणीत शिळं अन्न खाल्ल्याने आरोग्यास धोका होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com