Detox Drinks
Detox DrinksSaam Tv

Detox Drinks: सणासुदीनंतर वजन कमी करण्यासाठी 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स नक्की ट्राय करा

Health News: सणासुदीनंतर वजन कमी करण्यासाठी हे ज्यूस नक्की ट्राय करा.
Published on

Detox Drinks For Weight Loss:

सणासुदीत घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या पदार्थात खूप जास्त प्रमाणात साखर आणि कार्बोहायर्डेट्स असतात. त्यामुळे डायबिटीजचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर वजन वाढू शकते. याचा परिणाम आरोग्यावर होतो.

सणासुदीच्या काळात खाण्यापिण्यावर नियंत्रण राहत नाही. हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे यासाठी तुम्ही काही गोष्टी पाळायला हव्यात. या परिस्थितीत तुम्ही काही डिटॉक्स ड्रिंक्स पिऊन वजन कमी करु शकतात.

नारळपाणी

नारळपाणी हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. त्यातील गुणधर्म शरीरासाठी चांगले असतात. तसेच डिहायड्रेट राहण्यासाठी नारळपाणी खूप फायदेशीर आहे. सकाळी नारळपाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. त्यानंतर एक तास काही खाऊ नका. नारळपाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन निघून जाते.

भाज्यांचा ज्यूस

भाज्यांचा ज्यूस शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. तुम्ही बीट, गाजर, पालक, टॉमेटो याचा ज्यूस पिऊ शकता. त्यात तुम्ही आले किंवा चाट मसाला टाकू शकता. याने ज्यूसची चव वाढेल. हे ज्यूस प्यायल्यानंतर तासभर काहीही खाऊ किंवा पिऊ नका.

Detox Drinks
Poha Pakoda Recipe: सतत नाश्त्याला कांदे पोहे खाऊन आलाय वैताग? ट्राय करा झटकेपट बनणारे चविष्ट पकोडे, रेसिपी बघा

डिटॉक्स वॉटर

उत्तम आरोग्यासाठी तुम्ही डिटॉक्स वॉटर पिऊ शकतात. हे पाणी प्यायल्याने शरीरातील वाईट घटक निघून जातील. हे बनवण्यासाटी एका भांड्यात तीन लिटर पाणी घ्या. त्यात पुदिन्याची पाने, काकडी, लिंबाचे तुकडे टाका. रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी जेव्हाही तुम्हाला तहान लागेल तेव्हा हे पाणी प्या. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील.

ग्रीन टी

वजन कमी करण्यासाठी हर्बल टी हा सर्वोत्तम उपाय आहे. ग्रीन टी किंवा हर्बल टीमध्ये अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहील.

Detox Drinks
Detox Water: फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर आरोग्याच्या इतर गोष्टींसाठी फायदेशीर आहे डिटॉक्स वॉटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com