Viral News:आरामदायी गादी वापरताय, सावधान! लुसलुशीत गादी सोडते विषारी केमिकल? काय आहे मेसेजमागचं सत्य?

Comfortable Mattress : सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, त्यात आरामदायी गादीमुळे शारीरिक त्रास होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या व्हायरल मेसेजचं सत्य काय आहे, हे जाणून घेऊ.
Comfortable Mattress
Comfortable Mattress
Published On

तुम्ही झोपायला गादी वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्ही वापरत असलेली गादी तुमच्यासह लहानग्यांना आजारी पाडू शकते. होय, गादीत केमिकल असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहा.

झोपायला आरामदायी लुसलुसीत, मऊमऊ, उबदार अशी गादी वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण मऊमऊ गादी तुम्ही गाढ झोपेत असताना विषारी केमिकल बाहेर सोडते. आणि त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचा दावा करण्यात आलाय...हा दावा गंभीर आहे...आपल्या बाळाला शांत झोप लागावी म्हणून पालक बाळाला गादीवर झोपवतात... मात्र गादी बाळांना आजारी पाडू शकते. हा दावा आपल्यासाठी घातक असल्याने आम्ही पडताळणी सुरू केली... त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात

Comfortable Mattress
Hours of sleep by age: वयोमानानुसार एका दिवसात किती तास झोप घेतली पाहिजे? स्लीप चार्ट पाहून ठरवा तुमची झोप पूर्ण होतेय का!

एका संशोधनात मुलांच्या बेडजवळील हवेत सर्वात धोकादायक केमिकल आढळून आलं. यामध्ये फॅथलेट्स, ज्वालारोधक आणि UV फिल्टरचा समावेश होता. मुलांच्या शरीरातील उष्णता आणि त्यांच्या वजनामुळे गाद्यांमधून या विषारी घटकांची गळती वाढते. यामुळे हार्मोनल असंतुलन, दमा, मानसिक विकासात अडथळा येतो.

Comfortable Mattress
Relationship Tips: अचानक पार्टनरच्या वागणूकीत दिसणारे 'हे' बदल ओळखा; बॉयफ्रेंड तुमच्याशी कधीही करू शकतो ब्रेकअप!

या मेसेजमध्ये अधिक धोका बाळांना असल्याचं म्हटलंय. त्यामुळे याची सत्यता करणं महत्वाचं आहे. पण, सगळ्याच गाद्यांमधून केमिकल निघतं की काही विशिष्ट याची इत्थंभूत माहिती सांगणं गरजेचं आहे. हल्ली गाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात. आपलं प्रोडक्ट्स विकलं जावं यासाठी मार्केटमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे कोणत्या गाद्या हानिकारक ठरू शकतात. याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमची टीम एक्सपर्टला भेटली. त्यांना मेसेज दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य / साम इन्व्हिस्टिगेशन

नवीन ब्रॅण्डेड फोम बनवण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो

गादीवर झोपल्यावर गादीतून केमिकल बाहेर निघतात

केमिकल असल्यास मुलांना दमा, मानसिकतेवर परिणाम होतो

केमिकल वापरून केलेल्या गाद्यांमुळे मानसिक आजारही होतो

कापसापासून बनवलेल्या गाद्या चांगल्या असतात.

सर्वच गाद्यांमध्ये केमिकल नसतं. फॅथलेट्स, ज्वालारोधक आणि UV फिल्टरचा वापर केलेल्या गाद्यांमध्ये केमिकल असतं. त्यामुळे तुम्ही कापसाच्या गाद्या, वापरू शकता. आमच्या पडताळणीत गाद्यांमधील केमिकलमुळे मुलांना धोका निर्माण होतो हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com