Garlic Tea Benefits: हृदयाच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत गुणकारी आहे लसणाचा चहा, वाचा रेसिपी

Healthy Garlic Tea: लसूण हा आहारातील मुख्य घटक आहे. लसणाचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध लसूण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करते.
Garlic Tea Benefits: हृदयाच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत गुणकारी आहे लसणाचा चहा,  वाचा रेसिपी

भारतीय स्वयंपाकघरात विविध पदार्थ बनवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. आहारात लसणाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असा लसणाचा चहा कधी तुम्ही प्यायला आहे का? आजच जाणून घ्या कसा बनवायचा लसणाचा चहा आणि त्याचे फायदे काय?.

Garlic Tea Benefits: हृदयाच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत गुणकारी आहे लसणाचा चहा,  वाचा रेसिपी
Ginger Side Effects: उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

लसूण (Garlic) हा आहारातील मुख्य घटक आहे. लसणाचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध लसूण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करते.

लसणाच्या चहाचे आरोग्यदायी फायदे

लसूण हा आपल्या शरीरासाठी गुणकारी मानला जातो. लसणामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.

लसणाचा चहा शरीरातील रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी लसणाच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

पोटाच्या विविध समस्या असल्यास तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी लसणाच्या चहाचे सेवन केले जाते.

Garlic Tea Benefits: हृदयाच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत गुणकारी आहे लसणाचा चहा,  वाचा रेसिपी
Hair Care Tips: केसांना कंडिशनर लावताना 'या' चूका करू नका; अन्यथा पडेल टक्कल

लसणाचा चहा रेसिपी?

१) लसणाचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम २-३ पाकळ्या सोललेला लसूण घ्या.

२) गॅसवर एका भांड्यात एक ते दीड ग्लास पाणी घालून त्यात लसणाचे बारीक बारीक तुकडे करून टाका.

३)यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा आल्याचा रस, लिंबाचा रस आणि मध घालून उकळवून घ्या.

४) साधारणपणे ५ मिनिटे उकळल्यानंतर लसणाचा चहा पिण्यासाठी तयार असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com