Health Benefits : चमकदार आणि डागरहित त्वचेसाठी रोज करा हा योगा

vajrasana yoga pose: हे आसन रोज केल्याने त्वचा चमकदार होते आणि केस गळण्याची समस्याही कमी होते.  याशिवाय अनेक फायदे आहेत ज्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
 vajrasana yoga pose
Health Benefitsyandex
Published On

वज्रासन हे अनेक उपयुक्त योग आसनांपैकी एक आहे, जे तुमच्या आरोग्यासाठी आणि मनाला अनेक फायदे देते.  अध्यात्मिकदृष्ट्या, वज्रासन ही एक अशी मुद्रा आहे जी तुम्हाला नम्रता, शांतता आणि संयम शिकवू शकते.  याशिवाय ते तुमच्या त्वचेची आणि केसांचीही विशेष काळजी घेते.  हे आसन रोज केल्याने त्वचा चमकदार होते आणि केस गळण्याची समस्याही कमी होते.  याशिवाय वज्रासनाचे अनेक फायदे आहेत.

 vajrasana yoga pose
Guru Nanak Jayanti 2024 Quotes: यश मिळवण्यासाठी गुरु नानक यांचे 'हे' मौल्यवान विचार नक्की वाचा

वज्रासन चे फायदे

१. दररोज काही मिनिटे वज्रासन केल्याने तुमच्या पाठीच्या स्नायूंचे आरोग्य सुधारते आणि ते मजबूत होतात, ज्यामुळे पाठीच्या खालच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

२. हे आसन तुमच्या शरीरात निरोगी रक्तप्रवाह वाढवते.  त्याचबरोबर भोजन केल्यानंतर वज्रासनात बसणे हा चांगला अभ्यास मानला जातो.  हे आसन केल्याने पोटवर दाब येतो आणि पचन प्रक्रियेस मदत करते.

३. वज्रासनाचा नियमित सराव केल्याने तुमचे घोटे आणि गुडघे लवचिक होतात.  हे तुमचे अनेक अंतर्गत अवयव मजबूत करते, जसे की तुमचे पेल्विक फ्लेर स्नायू.

४.जरी वज्रासन वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत थेट योगदान देत नसले तरी ते पचनक्रिया सुधारते. आणि आपल्या आतड्याचे आरोग्य सुधारून ते गतिमान करते. वज्रासन केल्याने काय फायदे होतात.

५. मधुमेहाच्या रुग्णांनी जेवल्यानंतर १० ते १५ मिनिटे वज्रासनात बसल्यास त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होत.

Edited by - Archana Chavan

 vajrasana yoga pose
Healthy Poha Recipe: वजन कमी करायचं पण चवीत बदल नकोय? अगदी १० मिनिटांत बनवा हेल्दी-टेस्टी पोहे

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com