औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मेडिकल स्टोअरमध्ये जाताच आपण सहसा काय करतो? औषधाचे नाव वाचतो, एक्सपायरी डेट तपासतो आणि पैसे देऊन घरी परत येतो. परंतु, तुमचे कधी औषधाच्या पाकिटावर काढलेल्या लाल रंगाच्या सरळ रेषेवर लक्ष गेले आहे का?
RED LINE ON MEDICINE STRIP MEANING AND IMPORTANCE EXPLAINED
RED LINE ON MEDICINE STRIP MEANING AND IMPORTANCE EXPLAINEDPINTEREST
Published On: 

आपल्यापैकी बरेच जण याला एखादी डिझाइन किंवा कंपनीचे चिन्ह समजून दुर्लक्ष करतात. मात्र, हे कोणतेही साधे डिझाइन नसून, तुमच्या सुरक्षिततेशी जोडलेला एक महत्त्वाचा संकेत आहे.

लाल रेषेचा नक्की अर्थ काय?

भारताच्या 'ड्रग्ज रुल्स, १९४५' नुसार, औषधांच्या पॅकिंगबाबत विशेष नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनुसार, काही विशिष्ट औषधांच्या लेबलवर डाव्या बाजूला एक सरळ लाल पट्टी काढली जाते.

RED LINE ON MEDICINE STRIP MEANING AND IMPORTANCE EXPLAINED
केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

या पट्टीचा साधा अर्थ असा आहे की, ती औषध 'प्रिस्क्रिप्शन ड्रग' आहे. म्हणजेच, ही औषधे केवळ डॉक्टरांच्या पावतीवरच दिली जाऊ शकतात. या औषधांच्या पॅकिंगवर स्पष्ट चेतावणीही लिहिलेली असते. त्यामुळे कोणतीही खात्री न करता ही औषधे स्वतःच्या मर्जीने खाणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

प्रत्येक लाल पट्टीचा अर्थ सारखाच असतो का?

औषधाच्या पॅकिंगवर असलेला प्रत्येक लाल रंग हा केवळ प्रिस्क्रिप्शनची पट्टीच असतो असे नाही. औषधांच्या पाकिटांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चेतावणी आणि चिन्हे असू शकतात. त्यामुळे केवळ लाल रंग पाहून औषधाबद्दल स्वतःहून कोणताही अंदाज बांधू नका. औषध वापरण्यापूर्वी त्याचे नाव, डोस, त्यातील घटक, एक्सपायरी डेट आणि लेबलवर दिलेले निर्देश आवर्जून वाचा.

RED LINE ON MEDICINE STRIP MEANING AND IMPORTANCE EXPLAINED
Children’s eye health: मुलांच्या डोळ्यांवर स्क्रीनचा वाढता ताण! पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं

जुनी चिठ्ठी वापरून औषध खरेदी करणे धोकादायक

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने औषध घेणे अजिबात घेऊ नये. आपल्यापैकी अनेक जण जुन्या आजाराच्या पावत्या दाखवूनच पुन्हा मेडिकल स्टोअरमधून औषधे आणतात, जी अत्यंत चुकीची पद्धत आहे.

जेव्हाही आरोग्याची कोणतीही समस्या असेल, तेव्हा सर्वात आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी सांगितलेली औषधेच घ्या आणि सेवन करण्यापूर्वी एक्सपायरी डेट तपासण्यास अजिबात विसरू नका.

टीप: आरोग्याशी संबंधित कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com