Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढलाय की नाही? अवघ्या ३०० रुपयांची 'ही' टेस्ट वाचवेल तुमचा जीव?

Cardiovascular health: ApoB टेस्ट ही हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी महत्त्वाची रक्त तपासणी मानली जाते. कोलेस्ट्रॉल सामान्य असतानाही धोकादायक लिपोप्रोटीन कणांची माहिती या चाचणीतून मिळते. कोणासाठी ही तपासणी आवश्यक आहे ते पाहूयात.
Heart attack
Heart attacksaam tv
Published On

गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. हार्ट अटॅक, कार्डिअॅक अरेस्ट यांसारख्या गंभीर समस्या आता केवळ फक्त जेष्ठ व्यक्तीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. अनेक तरुणांनाही या आजारांचा फटका बसत असून मृत्यूचं प्रमाणही वाढताना दिसतंय.

हृदयाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी लिपिड प्रोफाइल, ईसीजी (ECG), हार्ट सीटी स्कॅन अशा अनेक चाचण्या केल्या जातात. मात्र तज्ज्ञांच्या मते आणखी एक रक्त तपासणी आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते. परंतु हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. या तपासणीचं नाव आहे ApoB (Apolipoprotein B) टेस्ट.

Heart attack
Heart attack symptoms: हार्ट अटॅक येण्याचा धोका कोणाला जास्त? शरीर आधी देत असलेल्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

ही एक साधी रक्त तपासणी असून रक्तातील अशा हानिकारक लिपोप्रोटीनची संख्या सांगते. जे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर तयार करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि पुढे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

आजच्या काळात हार्ट अटॅकचा धोका अचूक ओळखण्यासाठी ApoB टेस्ट ही सर्वात महत्त्वाच्या तपासण्यांपैकी एक मानली जाते. कारण अनेक वेळा कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असली तरी रक्तात धोकादायक कण जास्त प्रमाणात असू शकतात. अशा परिस्थितीत हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

ApoB टेस्टमध्ये नेमकं काय तपासलं जातं?

या टेस्टमधून मिळणारी माहिती

  • LDL (बॅड कोलेस्ट्रॉल)

  • VLDL

  • IDL

  • Lipoprotein(a) म्हणजेच Lp(a)

मेदांता मेडिसिटी मूलचंद रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. तरुण कुमार यांच्या मते, लिपिड प्रोफाइल तपासणीत केवळ रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी समजते. तर LDL तपासणीमधून फक्त बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कळतं. पण ApoB टेस्ट रक्तात एकूण किती हानिकारक लिपोप्रोटीन कण आहेत याची माहिती देतं. त्यामुळे अनेक वेळा हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी ही चाचणी अधिक उत्तम मानली जाते.

ApoB टेस्ट कोणासाठी महत्त्वाची?

डॉ. तरुण कुमार सांगतात की, प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी ही तपासणी करून घ्यायला हरकत नाही. मात्र, खालील लोकांसाठी ती विशेष महत्त्वाची आहे.

  • मधुमेह असलेले रुग्ण

  • इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या असलेले लोक

  • ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण जास्त असलेले

  • लठ्ठपणाचा त्रास असलेले

  • कमी वयात कुटुंबात हार्ट अटॅकचा इतिहास असलेले

  • बॅड कोलेस्ट्रॉल सामान्य असूनही हृदयविकाराचा धोका असलेले

अनेक व्यक्तींमध्ये LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असते. पण रक्तात त्याचं आकाराने लहान आणि संख्येने जास्त कण असतात. हे कण रक्तवाहिन्यांमध्ये अधिक सहज साचतात आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशा स्थितीची अचूक माहिती ApoB टेस्टमधूनच मिळू शकते.

Heart attack
Heart attack symptoms: हार्ट अटॅक येण्याचा धोका कोणाला जास्त? शरीर आधी देत असलेल्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

या टेस्टची किंमत किती?

ApoB टेस्ट फार महाग नाही. खासगी लॅबमध्ये साधारण 300 ते 500 रुपयांदरम्यान ही तपासणी केली जाते. लॅबनुसार दर कमी-जास्त असू शकतात. काही सरकारी रुग्णालयांमध्ये ही तपासणी मोफतही उपलब्ध असते.

ApoB चे प्रमाण किती असावं?

  • 90 mg/dL पेक्षा कमी – ज्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका आहे त्यांच्यासाठी योग्य.

  • 80 mg/dL पेक्षा कमी – हार्ट अटॅकचा धोका जास्त असलेल्या व्यक्तींनी हे प्रमाण राखणं आवश्यक.

  • 65 mg/dL पेक्षा कमी – ज्यांना यापूर्वी हार्ट अटॅक आला आहे त्यांच्यासाठी हे योग्य प्रमाण मानलं जातं.

Heart attack
Childhood cancer: लहानपणी कॅन्सर झाला होता? मग ही माहिती नक्की वाचा, उपचारांचे 'हे' दुष्परिणाम 30 वर्षांनीही येतात समोर

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com