Happy Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला अशा पध्दतीने द्या, तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा !

यावर्षी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना Whatsapp वर यापध्दतीने शेअर करा.
Happy Ganesh Chaturthi 2022
Happy Ganesh Chaturthi 2022Saam Tv
Published On

Happy Ganesh Chaturthi 2022 : नारळी पौर्णिमा संपली की, आपल्याला वेध लागतात गणेशोत्सवाचे. हिंदू (Hindu) धर्मामध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

या दिवसासाठी भक्त वर्षभर आसूसलेले असतात. आपल्या लाडक्या बाप्पाकडे डोळे लावून त्याची वाट पाहात असतात. या दिवशी बुद्धीची देवता असलेले गणराया (Ganpati) वाजत गाजत भक्तांच्या घरी विराजमान होतात.

Happy Ganesh Chaturthi 2022
Modak Recipe : उकडीचे मोदक बनवायचे आहे? कळ्या पाडताना तुटतात, या सोप्या टिप्सची मदत घ्या

यंदा गणेशोत्सव हा ३१ऑगस्ट म्हणजे उद्यापासून दहा दिवस चालणारा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. बाप्पाला दहा दिवसांच्या पाहुणचारामध्ये काही कमी पडू नये म्हणून भक्तांचे प्रयत्न सुरु असतात. बाप्पाचे आगमन झाल्यावर घरातील संकट, दुःख होतील हा भक्तांचा गणरायांवर विश्वास असतो.

लोक गणपतीच्या मातीच्या मूर्तीला घरी आणतात आणि त्यांची पूजा करतात. यंदा विनायक चतुर्थी ही ३१ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यावर्षी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना Whatsapp वर यापध्दतीने शेअर करा.

१. गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशीर्वाद राहू दे

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

२. भालचंद्रा, कृपाळू तू लंबोदरा,

असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,

जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,

सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

३. हरिसी विघ्न जणांचे,

असा तू गणांचा राजा..

वससी प्रत्येक हृदयी,

असा तू मनांचा राजा..

स्वीकार गणराया तुझिया चरणी,

साष्टांग दंडवत माझा..

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 : लाडक्या बाप्पासाठी बनवा ओरियो बिस्किटचे टेस्टी मोदक!

४. मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

५. श्रींच्या चरणी कर माझे जुळले

तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य वाढले.

अशीच कृपा सतत राहू दे

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganpati Bappa Morya
Ganpati Bappa MoryaCanva

६. गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली

मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली

आंनदाने सर्व धरती नटली

तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली

सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

७. गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

८. बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी,

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन,

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganpati Bappa Morya
Ganpati Bappa MoryaCanva

९. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना

गणपती बाप्पा मोरया!

१०. बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com