Hands-Feet Tingling : हाता-पायाला सतत मुंग्या येतात? शरीरात 'या' जीवनसत्त्वांची कमतरता

Hands-Feet Tingling Health Tips : हाता-पायाला सतत मुंग्या येत असल्यास शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. त्यामुळे वेळीच आहारात बदल करा आणि तुमचे आरोग्य जपा.
Hands-Feet Tingling Health Tips
Hands-Feet TinglingSAAM TV

आजकाल धावपळीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक शरीराच्या समस्या उद्भवतात. यामुळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हाता-पायाला मुंग्या येणे ही सामान्य समस्या असली तरी आरोग्यासाठी घातक आहे. हाता पायांना मुंग्या येणे हाडांसंबंधित आजारांचे आणि मज्जातंतूंच्या नुकसानाचे लक्षण आहे. त्यामुळे हाता-पायाला वारंवार मुंग्या येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हाता-पायाला मुंग्या येण्याची कारणे

 • जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हाता-पायाला मुंग्या येतात.

 • शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता असल्यास हाता-पायाला मुंग्या येतात.

 • मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनाही हाता-पायाला मुंग्या येतात.

व्हिटॅमिन डी चे स्तोत्र

 • मशरूम : मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करावा.

 • कोवळे ऊन : रोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये धावायला जा. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.

 • सूर्यफूल तेल : सतत हातापायांना मुंग्या येत असल्यास रात्री झोपताना सूर्यफूलाच्या तेलाने मालिश करावे.

 • संत्री : संत्र्याचा ज्यूस नियमित प्यायल्यास शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. तसेच शरीर हायड्रेटही राहते. संत्र्याचा ज्यूस पिताना त्यात साखर टाकू नये.

 • पालक : पालकमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोज आहारात पालकच्या भाजीचा समावेश करावा. यामुळे आपली पचनक्रिया देखील सुरळीत होते.

Hands-Feet Tingling Health Tips
Hair Care Tips: खोबरेल तेल की नारळाचे दूध, लांब केसांसाठी फायदेशीर काय ?

व्हिटॅमिन बी१२ चे स्तोत्र

 • अंड : अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी१२ असते. त्यामुळे् दररोज २ अंडी खावी. हाडांच्या आरोग्यासाठी अंड्यातील पिवळ बल्क फायदेशीर आहे.

 • केळ : केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे नियमित केळी खाणे आरोग्यास फायदेशीर आहे.

 • दही : दह्यामधील उपलब्ध घटकांमुळे शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते आणि हातापायाला मुंग्या येत नाही.

 • टोफू : टोफूमध्ये प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. टोफूचे सॅलड रोज खावे. त्यामुळे स्नायूंचे आरोग्य चांगले राहते.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hands-Feet Tingling Health Tips
Health Tips: पावसाळ्यात पोटाचे आजार कसे टाळायचे? तज्ञांकडून घ्या जाणून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com