Lemonade In Summer : उन्हाळ्यात प्या लिंबू पाणी, हायड्रेट राहाण्यासोबत इम्युनिटी होईल स्ट्रॉग

Lemon Water Benefits : लिंबू पाणी या आरोग्यदायी पर्यायांपैकी एक आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात लिंबू पाणी पित असाल तर त्याचे फायदेही जाणून घ्या
Lemonade In Summer
Lemonade In SummerSaam Tv
Published On

Summer Drink :

उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला डिहायड्रेशनची समस्या सुरु होते. वाढत्या तापमानामुळे आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात निरोगी राहाण्यासाठी आपण आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटांमुळे अनेकदा आपण आजारी पडतो. निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी आणि कपड्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात अनेकांना कोल्ड ड्रिंक्स वैगरे प्यायला आवडते, पण त्यामुळे आरोग्याला (health) अनेक हानी होते. थंड पेये बदलून काही आरोग्यदायी पर्याय घेऊ शकता. लिंबू पाणी या आरोग्यदायी पर्यायांपैकी एक आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात लिंबू पाणी (Lemon Water) पित असाल तर त्याचे फायदेही (Benefits) जाणून घ्या.

1. हायड्रेशन

लिंबू पाणी प्यायल्याने तुम्हाला हायड्रेट राहण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. अशावेळी उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते.

Lemonade In Summer
Diabetes Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी हे ५ पदार्थ खायलाच हवे, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

2. प्रतिकारशक्ती वाढणे

हवामानातील बदलामुळे अनेकदा आपली रोगप्रतिकारशक्ती कमकवूत होते. त्यामुळे अनेक आजारांना बळी पडतो. अशा परिस्थितीत लिंबू पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होईल. लिंबू व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत आहे. जे अँटिऑक्सिडेंट असून प्रतिकारशक्ती सुधारण्यात मदत करते.

3. शरीराला थंडावा मिळतो.

उन्हाळ्यात शरीर थंड करायचे असेल तर यासाठी लिंबू पाणी एक उत्तम पर्याय आहे. तहान भागवण्यासाठी आणि उष्णतेपासून थंडावा मिळावा यासाठी चांगले आहे.

Lemonade In Summer
Colon Cancer Causes : आतड्यांच्या कॅन्सरचा धोका सर्वाधिक, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

4. पचनास उपयुक्त

लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. लिंबाचा आंबटपणा पाचक रसांच्या उत्पादनास उत्तेजन देऊ शकते. हे पचनास मदत करते, अपचन आणि छातीत जळजळ या लक्षणांपासून आराम मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com