Yoga Tips: गर्भधारणेनंतर केस गळण्याची समस्या? 'या' योगासनांमुळे मिळवा आराम

Post Pregnancy Care: गर्भधारणेनंतर केस गळणे एक सामान्य समस्या आहे. काही विशिष्ट योगासनांद्वारे हे समस्या दूर होऊ शकते, केसांचे आरोग्य नीट होऊ शकते आणि तणाव कमी होऊ शकतो.
Yoga Tips
Yoga Tipsfreepik
Published On

गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर महिलांना हार्मोनल बदल, मानसिक तणाव आणि शरीरातील इतर बदलांमुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये केस गळणे एक सामान्य समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण हार्मोनल बदल, पोषणाचा अभाव, तणाव आणि कमी झोप असू शकतात. मात्र, योग्य योग आणि जीवनशैलीत बदल करून केस गळणे नियंत्रित आणि थांबवता येते.

गर्भधारणेनंतर किंवा प्रसूतीनंतर महिलांना मानसिक आणि शारीरिक बदलांचा सामना करावा लागतो. यामध्ये केस गळणे एक सामान्य समस्या आहे. काही खास योगासनांमुळे केसांचे आरोग्य सुधारू शकते, तसेच तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. हे आसनं न केवळ केसांना मजबुती देतात, तर नववधूच्या मानसिक शांततेसाठी देखील उपयुक्त ठरतात, जे तिच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

बालासन

वज्रासन स्थितीत बसा आणि हळूहळू कपाळ जमिनीवर ठेवा. दोन्ही हात पुढे वाढवा आणि ३० सेकंद ते १ मिनिट या स्थितीत रहा. बालासनाचा नियमित सराव तणाव आणि थकवा कमी करतो. यामुळे डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे टाळूला अधिक पोषण मिळते, आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

अधोमुख स्वानासन

अधोमुख स्वनासन करण्यासाठी, तळवे आणि पाय जमिनीवर ठेऊन उलटा V आकार तयार करा. पाठ सरळ ठेवा आणि डोके खाली वाका. या स्थितीत ३० सेकंद ते १ मिनिट राहा. यामुळे टाळूकडे रक्त प्रवाह वाढतो, ताण आणि थकवा कमी होतो, तसेच शरीराचे ताजेतवाने होण्यास मदत होते.

उत्तानासन

उत्तानासन केल्याने डोक्याकडे रक्ताभिसरण वाढते आणि पचनसंस्था सुधारते, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. या आसनाचा सराव करण्यासाठी, सरळ उभे राहून कंबरेपासून वाकवा. हातांनी पाय किंवा जमिनीला स्पर्श करा आणि डोके मोकळे ठेवा. ३० सेकंद या स्थितीत राहा, ज्यामुळे शरीराचे ताजेतवाने होण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com