Hair Growth Laddu : एक लाडू खाताच केस गुडघ्यापेक्षा लांब होतील; वाचा डाएट एक्सपर्टने सांगितलेला उपाय

Hair Growth Laddu Recipe : केसांच्या वाढीसाठी तुम्ही कधी लाडू खाल्ला आहे का? आज आम्ही तुमच्यासाठी केसांच्या वाढीवर रामबाण उपाय असलेल्या लाडूची रेसिपी आणली आहे.
Hair Growth Laddu Recipe
Hair Growth LadduSaam TV
Published On

केस गळणे, केसांत कोंडा येणे, केस पांढरे होणे अशा विविध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. केसांच्या या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काहीना काही प्रयत्न करत असतात. बाजारात केसांचे प्रॉब्लेम १०० टक्के दूर होणार असा दावा करणारे अनेक प्रोडक्ट आहेत. बऱ्याच व्यक्ती यावर विश्वास ठेवतात आणि केसांना हे प्रोडक्ट अप्लाय करतात. मात्र याने केस सुंदर होण्याऐवजी केसांचं मोठं नुकसान होतं.

मात्र आता केस गळतीची ही समस्या फक्त एक लाडू खाल्ल्याने दूर होणरा आहे. वाचून तुम्हालाही अश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे. डाएट एक्सपर्ट सिमरत कथुरिया यांनी या बद्दल माहिती सांगितली आहे. विविध औषधी गुणांनी तयार झालेला हा लाडू तुम्ही स्वत: घरी सुद्धा बनवू शकता. सिमरत यांनी याची रेसिपी सुद्धा शेअर केली आहे. चला तर मग आज केसांच्या सर्व समस्या दूर करणाऱ्या लाडूची रेसिपी जाणून घेऊ.

Hair Growth Laddu Recipe
Shampoo For Damaged Hair : झाडू सारखे रुक्ष केस देखील होतील सॉफ्ट आणि सिल्की; घरीच बनवा 'हा' एफेक्टीव शाम्पू

साहित्य

भोपळ्याच्या बिया - १/३ कप

पिस्ता - १/३ कप

किसलेला नारळ - २/३ कप

वेलची पावडर

मनुके - ३/४ कप

लाडू बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

सर्वात आधी एक पॅन घ्या. त्यामध्ये सर्व बिया आणि किसलेला नारळ मिक्स करून छान भाजून घ्या. भाजताना मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या.

व्यवस्थित सर्व भाजून झाल्यावर एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि एकत्र मिक्स करा.

त्यानंतर त्यात पॅनमध्ये मनुके सुद्धा टाकून घ्या. मनुके सुद्धा मंद गॅसवर भाजून घ्या.

पुढे सर्व मिश्रण थंड झाल्यावर ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यानंतर यात वेलची पावडर मिक्स करा आणि मिक्सरला बारीक करून घ्या.

सर्व मिक्सरला बारीक होत असताना तुम्हाला यामध्ये तेल किंवा तूप मिक्स करण्याची आवश्यकता नाही.

मनुके चिकट आणि गोड असल्याने अपोआप सर्व मिश्रणाचा गोळा तयार होतो.

तयार मिश्रण थोडे, थोडे घऊन याचे सुंदर लाडू वळून घ्या.

तयार लाडू तुम्ही काचेच्या एका वाटीत भरून ठेवू शकता.

फायदे

दररोज सकाळी यातील एक लाडू खावा. याने केसांसाठी आवश्यक ते सर्व घटक मिळतात. शिवाय यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तसेच शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.

Hair Growth Laddu Recipe
Yoga For Hair Growth: चमकदार आणि घनदाट केसांसाठी 'ही' योगासने ठरतील फायदेशीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com