Diwali Outfit 2022 : मुलांनी दिवाळीत 'या' लेटस फॅशन टिप्स फॉलो करा, दिसाल अधिक हँडसम

दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण.
Diwali Outfit
Diwali OutfitSaam Tv

Diwali Outfit Ideas 2022 : दिवाळी (Diwali) म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण (Festivals). त्यामुळे प्रत्येकाला दिवाळीत छान सजायला आणि नटायला नक्कीच आवडतं.

दिवाळीसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खास खरेदी करतात. वर्षभर कितीही शॉपिंग केली तरी दिवाळीची शॉपिंग प्रत्येकासाठी स्पेशल असते. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. दिवाळी पहाट, लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबीज यासाठी निरनिराळ्या आऊटफिट आणि दागदागिन्यांची शॉपिंग केली जाते. यंदाच्या दिवाळीला खास दिसण्यासाठी आणि पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही सुचवलेले हे स्पेशल आऊटफिट नक्की ट्राय करा.

Diwali Outfit
Diwali Wishes 2022 : 'या' दिवाळीला पाठवा तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा ! WhatsApp, Facebook च्या माध्यमातून

दिवाळी अगदी जवळ आली आहे, आणि यावेळी मुलांनी फॅशनमध्ये मुलींशी स्पर्धा करण्यासाठी या फॅशन टिप्स फॉलो करू शकतात. पुरूषांची फॅशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यामधून तुमच्यासाठी काही पोशाख (मेन्स फॅशन फॉर दिवाळी) शॉर्टलिस्ट केले आहेत जे तुम्ही या दिवाळीत वापरून पाहू शकता.

नेहरू जॅकेट -

नेहरू जॅकेट कधीही शैलीबाहेर नसतात आणि तुम्ही त्यांना कोणत्याही लांब आणि लहान कुर्त्यासोबत जोडू शकता. जर तुम्हाला कुर्ता घालणे आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या शर्टसोबत नेहरू जॅकेटही घालू शकता.

शॉर्ट कुर्ता -

जर तुम्ही दिवाळीच्या पार्टीला जात असाल तर तुम्ही शॉर्ट कुर्ता घालू शकता. शॉर्ट कुर्ता बहुतेकदा मिड-थाई पर्यंत असतो जो तुम्ही जीन्स, ट्राउझर्स आणि धोतीसोबत घालू शकता.

एंब्रायडरी कुर्ता -

चिकनकारी किंवा थ्रेड वर्क असलेला कुर्ता तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे आवश्यक आहे. ते परिधान करण्यास सोयीस्कर आहेत आणि तुम्ही त्यांना विविध शैली आणि रंगांमध्ये देखील सहज शोधू शकता.

Diwali Outfit
Diwali Recipe 2022 : यंदाच्या दिवाळीत बनवा जाळीदार असे खुसखुशीत अनारसे

एथ्निक बॉटम्स -

कुर्ता कशासोबत घालायचा याबाबत नेहमीच गोंधळ असतो. पण आता बाजारात सलवार, जोधपुरी पॅंट, धोती आणि चुरीदार असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्ही या दिवाळीत वापरून पाहू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com