Guru Purnima
Guru Purnima 2025Saam Tv

Guru Purnima 2025: यंदा गुरूपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मूहूर्त, तारिख आणि तिथी

Guru Purnima 2025: आषाढ पौर्णिमा हा सण गुरूपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरूपौर्णिमा हा सण यंदा कधी आहे ते जाणून घेऊया.
Published on

'गुरूब्रम्हा गुरूविष्णू, गुरूदेव महेश्वरा...' प्रत्येकाच्या जीवनात गुरूला विशेष महत्व आहे. आई- वडीलांनतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गुरू मार्ग दाखवतात. अशा गुरूला हिंदू धर्मात देवाश्रेष्ठ मानले जाते. दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात. त्यांना भेटवस्तू देतात. गुरूंच्या आशिर्वादाने जीवनात प्रगती होवो असा आशीर्वाद घेतात. हाच गुरूपौर्णिमा हा सण यंदा कधी आहे ते जाणून घेऊया.

Guru Purnima
Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्व आहे. या माहिन्याची पौर्णिमा तिथी देखील विशेष असते. आषाढ पौर्णिमा हा सण गुरूपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यंदाची गुरूपौर्णिमा १० जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. गुरूपौर्णिमा हा दिवस गुरूप्रति आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो ज्यामुळे आपली प्रगती, आपल्याला ज्ञानाचे महत्व कळले आहे.

Guru Purnima
Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

कधी आहे गुरूपौर्णिमा?

यावर्षी १० जुलै २०२५ रोजी गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, यावर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरूवात १० जुलै रोजी पहाटे १ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईलआणि ११ जुलै रोजी पहाटे २ वाजून ०६ मिनिटांनी समाप्त होईल.

गुरूपौर्णिमा पूजाविधी

१) गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

२) सकाळी स्नान झाल्यावर नवीन वस्त्र परिधान करा.

३) घराच्या देवाची पूजा करताना देवघर स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा.

४) देवघरामध्ये देवाची पूजा करताना गुरूची पूजा करा. गुरू मंत्राचा जप करा.

५) देवघरात तुपाचा दिवा लावून गुरूपठण करावे.

६) गुरूपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवाला फळे, खीर, मिठाई, गोड पदार्थाचे नैवैद्य दाखवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com