Gudi Padwa traditional Sheera Recipe: गुढीपाडव्यासाठी बनवा तोंडात टाकताच विरघळणारा 'हा' शिरा, नोट करा झटपट रेसिपी

Traditional Gudi Padwa Recipes: गुढीपाडव्याला गोडाचा पदार्थ प्रत्येकाच्याच घरी केला जातो. आज आपण गोडाचा सॉफ्ट शिरा कसा तयार करायचा? हे जाणून घेणार आहोत.
Traditional Gudi Padwa Recipes
Gudi Padwa traditional Sheera Recipegoogle
Published On

सध्या प्रत्येकाच्या घरात गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. हा सण हिंदू धर्मात नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. या दिवशी महिला सुंदर पांरपांरिक पद्धतीने सजतात. घरासमोर गुढी उभारून पुजा करतात. पण त्यामध्ये त्यांची जेवण बनवण्याची प्रचंड घाई असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला कमी वेळात झटपट शिरा कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. शिरा करताना कधी तो प्रचंड सुकलेला असतो तर कधी अळणी होतो. असं होऊ नये म्हणून तुम्ही पुढील प्रमाण फॉलो करू शकता.

Traditional Gudi Padwa Recipes
Gudi Padwa 2025 wishes: उभारुन आनंदाची गुढी दारी...! गुढीपाडव्याला प्रियजनांना द्या 'या' गोड शुभेच्छा

शिरा बनवण्यासाठी साहित्य

रवा १ वाटी

तूप २ मोठे चमचे

केळी दीड

ड्रायफ्रुट्स

दूध २ वाट्या

साखर १ वाटी

वेलची १ चमचा

खवा २ चमचे

दाणेदार शिरा बनवण्याची रेसिपी

सगळ्यात आधी जाड गढई घ्या. त्यामध्ये तूप २ पळी घाला. तुम्ही जितकं तूप वापराल तितका शिरा सॉफ्ट होईल आणि शिऱ्याची चव वाढेल. आता तूप गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला ड्रायफ्रुट्स घाला आणि स्लो गॅसवर अर्धा मिनिट परता. मग त्यामध्ये बारिक चिरलेली केळी टाकून छान परता. केळी थोडी सॉफ्ट झाली की त्यामध्ये खवा टाका. हे मिश्रण व्यवस्थिक मिक्स करा. तोवर दुसरीकडे बारिक रवा भाजून घ्या. तो भाजून झाल्यावर कढईत मिक्स करा.

Traditional Gudi Padwa Recipes
Gudi Padwa Traditional Food: गुढीपाडवा स्पेशल! घरीच बनवा साखरेच्या गाठी, तोंडात टाकताच विरघळतील

गुढी पाडवा पारंपरिक पदार्थ

रवा चांगला परता आणि लगेचच त्यामध्ये गरम दूध मिक्स करा. रवा पातळ होईल एवढं तरी दूध त्यामध्ये मिक्स करा. रवा सुकायला लागला की त्यामध्ये पुन्हा दूध मिक्स करून झाकण ठेवा. रवा थोडा सुकला की त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घाला. पुन्हा शिरा छान परतून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वरून सुद्धा ड्रायफ्रुट्स टाकून सजावट करू शकता. आता दोन मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून गरमा गरम शिरा सर्व्ह करा. हा शिरा बनवायला तुम्हाला जास्तीत जास्त १५ ते २० मिनिटे लागतील.

टीप: तुम्ही पाडव्याच्या एक दिवस आधी ड्रायफ्रुट्स चिरुन ठेवू शकता. तसेच रवा सुद्धा भाजून ठेवू शकता.

Traditional Gudi Padwa Recipes
HBD Akshaye Khanna: अक्षय खन्नाचे TOP 7 चित्रपट पाहिलेत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com