Saam Tv
अनेक वेळा आपल्याला सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. आपण दुधासोबत बदाम, काजू खातोच. पण यापासून तयार होणारा पौष्टीक पदार्थ आपण बनवत नाही.
बदामात शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे असतात. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आणि मॅग्नेशियम असतात. चला तर तयार करु हा पौष्टीक पदार्थ.
बदाम, साखर, दूध, वेलची पूड, तूप, पिस्ता
बदाम ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर बदानमाचे साल काढून मिक्सरमध्ये त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
आता गॅस ऑन करुन त्यावर जाड कढई ठेवा. कढईत तूप अॅड करा. तूप तापल्यावर त्यात बदामाची पेस्ट अॅड करा. ही पेस्ट रंग बदलेपर्यंत व्यवस्थीत भाजून घ्या.
साधारण ५ मिनिटांनी त्यात दूध अॅड करा आणि त्यावर झाकण ठेवा.
तयार पौष्टीक शिरा
दूध आटल्यावर त्यात साखर , वेलची पूड आणि पिस्ता अॅड करा. हे मिश्रण दोन मिनिटे भाजून घ्या. तयार आहे तुमचा झटपट बदामाचा पौष्टीक शिरा.
NEXT : तुम्हाला माहितीये का संस्कृतमध्ये गुलाबजामला काय म्हटलं जातं?