वाढत्या कोरोनाच्या काळात ग्रीन टी ठरेल फायदेशीर !

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ग्रीन टीचा फायदा कसा होईल.
Benefits Of Drinking Green Tea, Health tips, Can Drinking Green Tea Prevent Or Cure COVID-19?
Benefits Of Drinking Green Tea, Health tips, Can Drinking Green Tea Prevent Or Cure COVID-19?ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण ग्रीन टी चा पर्यायी म्हणून वापर करतो. ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील विघटक घटक बाहेर पडण्यास मदत होते.

हे देखील पहा -

ग्रीन टीमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. शरीराचे वाढलेले वजन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. पुन्हा कोरोना वाढत असल्यामुळे त्याची लक्षणे ही सौम्य दिसत असली तरी त्याचे परिणाम हे अस्वस्थ करणारे आहे. या परिस्थितीत यासाठी अनेकांना ग्रीन टी फायदेशीर ठरली आहे. ग्रीन टी चा फायदा कसा होईल हे जाणून घेऊया. (Benefits Of Drinking Green Tea)

१. ग्रीन टीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तिला अँटिऑक्सिडंट, अँटीव्हायरल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. ग्रीन टी ही संक्रमण आणि विविध आजारांपासून दूर राहण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये झिंक, सेलेनियम, कॉपर, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन बी २ ने समृद्ध आहे. जी फक्त व्हायरल इन्फेक्शन्सविरूद्ध अँटीबॉडी फंक्शन्स वाढवत नाही तर संक्रमणाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण करते.

Benefits Of Drinking Green Tea, Health tips, Can Drinking Green Tea Prevent Or Cure COVID-19?
किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी हे सुपरफूड ठरतील फायदेशीर !

२. ग्रीन टी मध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे ती कोरोना किंवा साथीच्या रोगावर उपयुक्त अशी ठरते. कोरोनामुळे घशातील किंवा आतड्यांमधले स्तर, आपल्या रक्तातील रसायने आणि विविध रोगप्रतिकारक पेशी यासारख्या आजारांचा समावेश होतो. यात असणाऱ्या विषाणूंवर मात करण्यासाठी ती फायदेशीर ठरते. (Can Green Tea Help Cure COVID-19?)

३. तज्ज्ञांच्या मते, तज्ञांच्या मते, ग्रीन टीमध्ये आरोग्यास प्रोत्साहन देणारे पॉलीफेनॉल आहेत ज्यामुळे ते कोरोनासारख्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. परंतु, ग्रीन टी मुळे कोरोना टाळू किंवा बरा करु शकत नाही. ग्रीन टी फक्त शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करते.

४. तसेच ग्रीन टी ही पोषक तत्वांनी भरलेली, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडेंट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याव्यतिरिक्त तिचे इतर अनेक आरोग्यास फायदे आहेत. ती वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते, मेंदूची कार्ये सुधारते, विशिष्ट कर्करोगाचा धोका कमी करते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास लाभ (Benefits) देते आणि रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रित करण्यात मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com