किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी हे सुपरफूड ठरतील फायदेशीर !

किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा.
Health Tips, Foods for Kidney Health, How To Improve Kidney Health, Superfoods for kidney Health
Health Tips, Foods for Kidney Health, How To Improve Kidney Health, Superfoods for kidney Healthब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : शरीरातील महत्त्वाच्या अवयंवापैकी महत्त्वाचा अंग किडनी आहे. आपल्या शरीरातील विघटक घटक बाहेर काढण्यासाठी किडनी आपल्याला मदत करते.

हे देखील पहा -

मूत्रपिंड रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावतात तेव्हा मूत्रपिंडाचे आजार होतात. या आजारांने ग्रस्त असलेल्या भारतीयांची संख्या ही सध्या दुप्पट झालेली आहे. यामध्ये वृध्द अवस्थेतील लोकांची संख्या ही ८ ते १० टक्के आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे मूत्रपिंडाच्या आजारासाठी घातक आहे. हा आजार असलेल्या लोकांनी आपल्या आहारात कोणते पदार्थ खावे हे जाणून घेऊया. (Foods for Kidney Health)

१. कोबीमध्ये अनेक जीवनसत्त्व व खनिजे आहेत. यात जीवनसत्त्व के, ब व क आढळून येतात. कोबीत फायबर असल्यामुळे तिचे सेवन केल्यास पचनसंस्थेला निरोगी ठेवते ज्यामुळे शरीरातील आतड्यांची नियमितपणे हालचाल होईल. कोबीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि सोडियमचे प्रमाण कमी असते जे किडनीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आरोग्यदायी असते.

Health Tips, Foods for Kidney Health, How To Improve Kidney Health, Superfoods for kidney Health
'ड' जीवनसत्त्वाच्या औषधांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचे दूष्परिणाम कसे होतात ?

२. फ्लॉवरमध्ये अनेक पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे. या भाजीमध्ये जीवनसत्त्व क, के व ब आणि फोलेट समाविष्ट आहे. याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. ही भाजी कच्च्या स्वरूपात, वाफवून किंवा सूप बनवून तिचे सेवन करु शकतो. शिजवलेल्या फ्लॉवरमध्ये १९ मिलीग्राम सोडियम, १७६ मिलीग्राम पोटॅशियम आणि ४० मिलीग्राम फॉस्फरस असते. जे किडनीसाठी फायदेशीर (Benefits) ठरते.

३. किडनाचा आजार असणाऱ्या लोकांना आहारात मिठासह सोडियम कमी प्रमाणात वापरण्याचा सल्ला दिला जातो. लसूणमध्ये मॅग्नेशियम,जीवनसत्त्व क आणि ब-६ चा चांगला स्रोत आहे. यामुळे आपल्याला मीठाची कमतरता जाणवणार नाही. लसणात १.५ मिलीग्राम सोडियम, ३६ मिलीग्राम पोटॅशियम आणि १४ मिलीग्राम फॉस्फरस असते. (How To Improve Kidney Health)

४. लाल द्राक्षांच्या सेवनाने शरीरात जीवनसत्त्व (Vitamins) क, फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट आहेत ज्यामुळे ते शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण असते जे किडनीसाठी अनुकूल असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com