
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या आणि Aiच्या युगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामध्ये सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या ब्राउजरचा आता युजर्सना धोका निर्माण होणार आहे. कारण भारत सरकारच्या एजन्सी CERT-In ने Google Chrome आणि Mozilla Firefox ब्राउजर यूजर्सना सिक्योरिटी अलर्ट जाहीर केला आहे. कारण अनेकांची पर्सनल माहिती किंवा डाटा चोरीच्या समस्यांपासून तुम्हाला दूर राहता येईल. जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
तुम्ही वापरत असलेले डिव्हाइस हॅकर्स सहज हॅक करुन तुमचा डेटा चोरू शकतात. असे होऊ नये म्हणून पुढील काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. कारण मिळवलेल्या डेट्यामधील हॅकर्स डिव्हाइसवर मालवेअर चालवण्यासाठी करु शकतात. CERT-In ने सांगितले आहे की, Google Chromeच्या काही वर्जन्समध्ये भयंकर बग निर्माण आहेत.
ज्यात Linux वर 141.0.7390.54 आणि Windows किंवा macOS वर 141.0.7390.54/55 पेक्षा जुने आहेत याचा समावेश आहे. इतकेच नाही तर यामध्ये WebGPU आणि Video मध्ये heap buffer overflow, Storage आणि Tabमधील डेटा लीक, Media आणि Drmboxमध्ये चुकीचे गोष्टींचाही समावेश आहे. याचाच फायदा घेऊन कोणताही रिमोट अटॅकर यूजर ही माहिती मालिशियस वेबसाइटवर पाठवू सिस्टीममध्ये कोड चालवू शकतो आणि प्रायवेट डाटा घेऊ शकतो.
iOS साठीच्या Mozilla Firefox च्या जुन्या पुराव्यांमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. 143.0.3 पेक्षा जुन्या आणि 143.1 पेक्षा कमी आवृत्त्या वापरणाऱ्या वापरकर्त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या त्रुटींमध्ये कुकी स्टोरेजचा चुकीचा आयसोलेशन, ग्राफिक्स कॅनव्हास२डी मध्ये इंटिजर ओव्हरफ्लो, आणि JavaScript इंजिनमधील चुकीचे JIT संकलन यांचा समावेश आहे.
सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते, जर युजर्स दुर्भावनापूर्ण (malicious) वेब लिंकवर क्लिक करत असेल, तर हॅकर्सना ब्राउझरवर नियंत्रण मिळवून वापरकर्त्यांची गुप्त माहिती जसे की पासवर्ड्स, बँकिंग डिटेल्स, किंवा सेव्ह केलेले कुकी डेटा चोरण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त नवीन अपडेटेड गुगल क्रोम डाऊनलोड करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.