Gold Investment : सोनं खरेदी करताना काय खबरदारी घ्याल? चांगल्या परताव्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध

सध्या फिजिकल सोन्याऐवजी डिजिटल सोन्याकडे लोकांचा कल वाढत आहे. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करताना काही कर-संबंधित फायदे देखील मिळतात.
Gold
GoldSaam Tv
Published On

मुंबई : सणासुदीच्या काळात सोन्याच्या (Gold) खरेदीत वाढ होते. त्यात सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी घसरण पाहिली गेली आहे त्यामुळे नक्कीच अनेकांचा कल सोनं खरेदीकडे असणार आहे. मात्र सोनं खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी बाळगणे गरजेचं आहे. अनेकदा लोक सणांच्या काळात सोन्याचे दागिने, नाणी आणि सोन्यापासून बनवलेल्या इतर वस्तूंच्या खरेदीत गुंतवणूक करतात. सोन्याची खरेदी करताना करताना काळजी न घेतल्यास तो नफ्याऐवजी तोट्याचा सौदा ठरू शकतो.

Gold
ब्लूटुथ इअरफोन वापरताय? कॅन्सरसह इतर गंभीर आजारांचे धोके; समस्या आणि उपाय समजून घ्या

सोन्याचे दागिने खरेदी करताना दागिने बनवण्यासाठी विशेष शुल्क आकारले जाते. दागिने बनवताना सोन्याचा दर्जा कमी असण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत फिजिकल सोन्यात गुंतवणूक (Investment) केल्यास नफ्याऐवजी तोटा होऊ शकतो. याशिवाय सोन्याचे दागिने चोरी होण्याची भीतीही असते. त्यामुळे सोन्याचे दागिने बँक लॉकरमध्ये ठेवलेलं केव्हाही सुरक्षित आहे.

डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

सध्या फिजिकल सोन्याऐवजी डिजिटल सोन्याकडे लोकांचा कल वाढत आहे. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करताना काही कर-संबंधित फायदे देखील मिळतात. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा एक फायदेशीर सौदा असल्याचे सिद्ध होते. आजकाल डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सोने खरेदी आणि विक्री करता येते. याद्वारे, सोन्याच्या किमती वाढल्यावर त्याचाही नफा होऊ शकतो आणि त्यांना कोणतेही मेकिंग चार्जेस द्यावे लागणार नाहीत.

Gold
महत्वाचा निर्णय; 'त्या' वन कर्मचाऱ्यांच्या वारसांना २५ लाख, नोकरीही मिळणार

SIP द्वारे सोन्याची खरेदी

एसआयपीच्या सुविधेसह डिजिटल सोने देखील खरेदी करता येते. तुम्ही पाचशे रुपये देऊनही सोने खरेदी करू शकता. अशी खरेदी केल्यावर, तुमच्या खात्यातून एसआयपीची रक्कम कापली जाते. गोल्ड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही डिमॅट खाते आवश्यक नाही. यामध्ये अनेक कंपन्या गोल्ड फंड जारी करतात. यामध्ये तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. अनेक पेमेंट अॅप्स देखील सध्या डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा देतात.

सॉवरेन गोल्ड बाँडमध्येही गुंतवणूक करू शकता

डिजिटल सोन्याव्यतिरिक्त, सॉवरेने गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणे देखील एक चांगला पर्याय आहे. या दिवाळीत तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सॉवरेन गोल्ड बाँड्समध्ये, इश्यू किमतीवर दरवर्षी निश्चित व्याज दिले जाते. ही सुविधा फिजिकल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफमध्ये उपलब्ध नाही. सॉवरेन गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीवरील व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी आपोआप तुमच्या खात्यात जमा होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com