Family Travel Tips: वयोवृद्धांसोबत फॅमिली ट्रिपला जाताय ? प्रवास करताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Elderly Family Travel Tips : तुम्हीही तुमच्या वृद्ध आई-वडिलांसोबत सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर प्रवासापूर्वी बरीच तयारी करणे आवश्यक आहे.
Travel Tips
Travel Tips Saam Tv

Family Travel Tips : तुम्हीही तुमच्या वृद्ध आई-वडिलांसोबत सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर प्रवासापूर्वी बरीच तयारी करणे आवश्यक आहे. यामध्ये डेस्टिनेशनपासून ते हॉटेल बुकिंग, फ्लाइट तिकिटांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे, पण ही तयारी इथेच संपत नाही. इतरही काही गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

आरोग्य तपासणी करा -

तुमची वृद्ध आई एकटी सहलीला जात असेल किंवा तुमच्यासोबत, या दोन्ही वेळी सहलीला जाण्यापूर्वी तिची आरोग्य (Health) तपासणी करून घेणे आवश्यक आहे. बॉडी चेकअप करून त्यांचे बीपी, शुगर आणि इतर काही प्रॉब्लेम असतील तर ते कळेल. ज्यामुळे या स्थितीत सहलीला जाणे सुरक्षित आहे की नाही हे ठरवणे सोपे होईल.

Travel Tips
Solo Travelling Tips In June : जून महिन्यात सोलो ट्रॅवलिंग करण्यासाठी भारतातील ही ठिकाणे ठरतील बेस्ट

औषधे घेणे विसरू नका -

जर त्यांना आधीच समस्या (Problems) असेल, कोणाची औषधे चालू असतील तर ती सोबत ठेवायला विसरू नका आणि कोणत्याही प्रकारचा त्रास नसला तरीही ताप, डोकेदुखी, वेदनाशामक औषधे सोबत ठेवा. त्यांची कधीही गरज भासू शकते.

निरोगी पदार्थ सोबत ठेवा -

वृद्धापकाळात पचनसंस्था कमजोर होते. अन्न नीट पचत नाही. अॅसिडीटी, गॅसचा त्रासही खूप त्रासदायक असतो, त्यामुळे त्यांना हलका आणि आरोग्यदायी आहार (Diet) द्या जेणेकरून प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही. वारंवार भूक भागवण्यासाठी तळलेले अन्न खाऊ नका. त्याऐवजी ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे, मखना असे पर्याय ठेवा.

Travel Tips
Summer Travel Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताय? तर 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, प्रवास होईल अधिक सुखकर !

तिकीट कन्फर्म असेल तरच प्रवास करा -

ज्येष्ठांसोबत प्रवास करताना याची विशेष काळजी घ्या. ट्रेनच्या प्रवासादरम्यान अनेक वेळा सीट न मिळाल्याने जे होईल ते बघून होईल या विचाराने लोक प्रवासाला निघून जातात, पण हा विचार प्रवासादरम्यान वृद्ध लोकांसोबत न ठेवणेच बरे. त्यांना जागा मिळाली नाही तर लांबच्या प्रवासात त्यांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com