Solo Travelling Tips In June : जून महिन्यात सोलो ट्रॅवलिंग करण्यासाठी भारतातील ही ठिकाणे ठरतील बेस्ट

June Travelling Tips : जगात क्वचितच असा कोणी असेल ज्याला प्रवास करायला आवडत नाही.
Solo Travelling Tips In June
Solo Travelling Tips In JuneSaam Tv
Published On

Solo Travelling Tips : जगात क्वचितच असा कोणी असेल ज्याला प्रवास करायला आवडत नाही. काहींना कुटुंबासोबत फिरायला आवडते, तर काहींना मित्रांसोबत बाहेर फिरायला जायला आवडते. पण या सगळ्या व्यतिरिक्त असे लोक आहेत ज्यांना एकट्याने प्रवास करायला आवडते. उन्हाळ्यात प्रवास करणं एखाद्या साहसापेक्षा कमी नाही.

उन्हाळ्याच्या सुट्टीत एकट्याने प्रवास (Travel) करण्याचीही एक वेगळीच मजा आहे. तथापि, जर तुम्ही देखील जून महिन्यात एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही अजिबात चुकवू नका. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल...

Solo Travelling Tips In June
Camping Travel Tips : कॅम्पिंगला जाण्याचा प्लान करताय ? ट्रेनचा प्रवास ठरेल बेस्ट ! भारतातील या 5 अनएक्प्लोर्ड ठिकाणांना भेट द्या

लडाख -

Ladakh
LadakhCanva

जून महिन्यात कडाक्याची उष्णता (Heat) असते. विशेषतः मैदानी भागात तापमान ४५ अंशांच्या वर जाते. या महिन्यात लोक डोंगराकडे वळतात. जून महिन्यातही तुम्ही अशा ठिकाणांना भेट देऊ शकता. जूनच्या सुट्ट्यांमध्ये लडाखला भेट देण्याची योजना करा. इथल्या प्रेक्षणीय दृश्यांवरून तुमची नजर हटवणे कठीण होईल.

शिमला -

Shimala
ShimalaCanva

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाही लोकांची पहिली पसंती आहे. डोंगराच्या मधोमध वसलेले हे शहर उन्हाळ्याच्या हंगामात उत्तम उन्हाळी ठिकाण आहे. एकटे प्रवासी देखील शिमलाला भेट देऊ शकतात.

Solo Travelling Tips In June
Malshej Ghat Travel: सावधान! माळशेज घाटातून प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच...

ऋषिकेश -

Rishikesh
Rishikesh Canva

अध्यात्मिक शहर ऋषिकेश हे देखील एका अद्भुत ठिकाणापेक्षा कमी नाही. येथे तुम्ही पवित्र गंगा नदीत स्नान करून ताजेतवाने आणि शांत होऊ शकता.

धर्मशाळा -

Dharamshala
DharamshalaCanva

बौद्ध मठांमुळे प्रसिद्ध धर्मशाळा देखील एकट्या पर्यटकांसाठी योग्य ठिकाणापेक्षा कमी नाही. इथले तापमान (Temperature) बऱ्यापैकी राहते, त्यामुळे तुम्ही हिंडून इथे सहज येऊ शकता.

Solo Travelling Tips In June
Konkan Travel Plan : 'येवा कोंकण आपलोच आसा...', मे महिन्यात कोकणात जाण्याचा प्लान करताय ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

नैनीताल -

Nainital
NainitalCanva

नैनीताल, उत्तराखंडमधील कुमाऊं टेकड्यांचे विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता. नैनिताल हे प्रत्येक ऋतूसाठी योग्य असले तरी उन्हाळ्यात येथे भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे.

खीरगंगा -

Kheerganga
Kheerganga Canva

ज्यांना ट्रेकिंग आवडते त्यांनी खीरगंगेला जरूर भेट द्यावी. हे ठिकाण हिमाचल प्रदेशात आहे. येथे ट्रेकिंग व्यतिरिक्त गरम पाण्याच्या झऱ्यांचा आनंद लुटण्याची संधी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com