Home decorating ideas: असे इंटीरियर करून घराला द्या घरपण!

ट्रेंडनुसार घराला द्या नवीन लूक.
home decorating ideas in marathi, Decoration Tips in Marathi, interior ideas in Marathi, Home interior tips
home decorating ideas in marathi, Decoration Tips in Marathi, interior ideas in Marathi, Home interior tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई: प्रत्येकाला आपले घर (Home) सुंदर ठेवायला आवडते पण हल्लीच्या धावपळीच्या जगात घराकडे अधिक लक्ष दिले जात नाही. बाजारात ट्रेंडनुसार नवीन पद्धती आपण पाहत असतो. सोशल मीडियावर तर घर सजवण्यासाठी नवीन ट्रेंडदेखील आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर घराला इंटीरियर करण्यासाठी एक विशेष टीम देखील असते. पण आपल्या महिन्याभराच्या खर्चातून आपल्याला इंटीरियर करणे जमत नाही त्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या खर्चाचे (Budget) ताळमेळ राखून घर सुंदर कसे ठेवू शकता यासाठी काही टिप्स (Tips) देणार आहोत. (Home decorating ideas in Marathi)

हे देखील पहा -

घर सुंदर ठेवण्यासाठी काही खास टिप्स फॉलो करा.

१. एस्थेटिक डेकोर -

सध्या एस्थेटिक डेकोरचा ट्रेंड दिसून येत आहे. या ट्रेंडमध्ये घराचे इंटीरियर, आर्टवर्क आणि घरात असणाऱ्या काही जुन्या वस्तुंना अनुसरून घराला नवीन लोक देता येईल.

२. फेयरी स्ट्रिंग लाईट्स -

आपण आपल्या बेडरूमला सजवण्यासाठी फेयरी स्ट्रिंग लाईट्सचा उपयोग करू शकतो. आपण आपल्या बेडरूमच्या खिडक्यांना किंवा आपल्या आवडत्या भिंतीला सजवू शकतो.

home decorating ideas in marathi, Decoration Tips in Marathi, interior ideas in Marathi, Home interior tips
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना या गोष्टी लक्षात ठेवा

३. मोठ्या आकाराचा आरसा -

घराच्या सुंदरतेत भर घालण्यासाठी आपण आपल्या हॉल रूममध्ये मोठ्या आकाराचा आरसा आपण लावू शकतो.

४. वॉलपेपर -

हल्लीच्या ट्रेंडनुसार घरातली एका भिंतीवर रंगरंगोटी करतो. पण सध्या बाजारात नवनवीन प्रकारचे वॉलपेपर मिळतात त्याचा वापर करून आपण आपल्याला हवा तसा वॉलपेपर सेट करू शकतो. तसेच घरात काही फ्रेमही लावू शकतो.

५. हँगिंग प्लांट -

घरात नैसर्गिक ऊर्जा टिकवण्यासाठी बऱ्याचदा काही वेळा आपण इनडोअर प्लांटचा वापर करतो. न वापरात असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्याचा वापर करून आपण स्वयंपाक घरात झाडे लावू शकतो.

६. स्विंग खुर्ची -

आपल्या घरात असणारी गॅलरी सगळ्यांना आवडते. आपण आपल्या गॅलरीत स्विंग खुर्ची ठेवून काही छोटी रोपटी लावू शकतो.

अशाप्रकारे आपण घराला सुंदर बनवू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com