Natural Face Cleanser: चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करत मिळवा चमक, किचनमधील 'या' 2 वस्तूचा असा करा वापर!

Skin Care : चेहऱ्यावर असणारे काळे डाग, मुरूम, सुरकुत्या दूर करण्यासाठी तरुणी वेगवेगळ्या टिप्सचा (Beauty Tips) वापर करुन त्वचेची काळजी घेतात.
Skin Care Tips
Skin Care Tips Saam Tv
Published On

Skin Care Tips: प्रत्येक तरुणीला आपली त्वचा ही मुलायम आणि चमकदार असावी असे वाटत असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) अनेक तरुणी त्वचेच्या समस्यांचा सामना करतात. चेहऱ्यावर असणारे काळे डाग, मुरुम, सुरकुत्या दूर करण्यासाठी तरुणी वेगवेगळ्या टिप्सचा (Beauty Tips) वापर करुन त्वचेची काळजी घेतात.

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तरुणी पार्लरमध्ये जातात आणि महागड्या स्किन केअर क्रिम्सचा वापर करतात. पण बऱ्याचदा त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही आणि त्यांचे पैसे वाया जातात. अशावेळी आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील दोन गोष्टींचा वापर करुन कशापद्धतीने त्वचेची काळजी घ्यायची याबद्दल सांगणार आहोत...

Skin Care Tips
Amla Pickle Recipe : चटपटतील आवळ्याच्या लोणच्याची चव चाखलीये का ? पाहा रेसिपी

स्वयंपाक घरात वापरले जाणाऱ्या दूध आणि मधाचा वापर करुन तुम्ही अवघ्या काही दिवसांमध्येच सुंदर, मुलायम आणि ग्लोईंग स्किन मिळवू शकता. याचा वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या देखील दूर होतील. त्यासाठी तुम्हाला दूध आणि मधापासून क्लिन्जर तयार करायचे आहे. ते कसे तयार करायचे, त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत..

असे तयार करा क्लिन्जर -

त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कच्चे दूध आणि मध घ्यावे लागेल. एका वाटीमध्ये तीन ते चार चमचे कच्चे दूध घ्या. या दूधामध्ये चार ते पाच चमचे मध टाकून ते व्यवस्थित मिक्स करुन घ्या. दूध आणि मध अशाप्रकारे मिक्स करुन घ्या की ते तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावता येईल. अशापद्धतीने तुमचे घरगुती क्लिन्जर तयार होईल.

Skin Care Tips
Dark Forehead Home Remedies: चेहरा गोरा पण कपाळावर टॅनिंग जास्त ? जाणून घ्या कारणं व सोपे उपाय

असा करा क्लिन्जरचा वापर -

या घरगुती क्लिन्जरचा वापर करण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे घरगुती क्लिन्जर तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. यासाठी तुम्ही हाताच्या बोटांचा वापर करु शकता किंवा तुम्ही ब्रशचा देखील वापर करु शकता. हे क्लिन्जर तुम्ही मानेवर देखील लावू शकता. आता चार ते पाच मिनिटं चेहरा असाच ठेवा.

त्यानंतर तुम्ही हाताच्या मदतीने स्क्रबिंगप्रमाणे सर्कुलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करा. पाच मिनिटांपर्यंत मसाज केल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर लगेच पुसू नका. तर काही वेळ चेहरा असाच ठेवा. त्यानंतर चेहरा पुसून टाका. आता तुम्ही याचा वापर आठवड्यातून दोन ते तीन वेळा करु शकता.

Skin Care Tips
Diabetes Health Tips: मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी खाव्यात या गोष्टी, रक्तातील साखरेची पातळी लगेच होईल कमी !

दूध आणि मधाचे फायदे -

दूध आणि मध हे फक्त आपल्या चेहऱ्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी मधाचे सेवन केल्यामुळे तुमचे शरीर आतून मजबूत होते. तर दूधामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण दूध आणि मधाचे सेवन करतात. डॉक्टरांकडून देखील याचे सेवन करण्यासाठी सल्ला दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com