Ganesh Visarjan 2023
Ganesh Visarjan 2023 Saam Tv

Ganesh Festival 2023: पुढच्या वर्षी लवकर या! शुभ मुहूर्तावर करा गौरी-गणपतीचे विसर्जन

Ganeshotsav 2023 : बाप्पाचे विसर्जन या मुहूर्तावर करा.
Published on

Ganesh Visarjan 2023

देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्व वातावरण मंगलमय झाले आहे. परंतु बाप्पाचे विसर्जन होताना डोळ्यात अश्रु आणि कंठ दाटून येतो. आज ५ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन होणार आहे. भावूक होऊन बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

बाप्पाच्या येण्याचा मुहुर्त जसा असतो. तसाच बाप्पाच्या विसर्जनाचा मुहूर्तदेखील असतो. आज ५ दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन आहे. 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत बाप्पाला निरोप देण्यासाठी आज खूप गर्दी पाहायला मिळणार आहे. हे विसर्जन कोणत्या मुहूर्तावर करावे याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Ganesh Visarjan 2023
Petrol Diesel Price (23 September): कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वधारले; पेट्रोल-डिझेल महागणार? पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

२३ सप्टेंबर म्हणजे आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनासाठी सकाळी ६.११ ते ७.४० हा मुहूर्त चांगला आहे. तर त्यानंतर सकाळी ९.१२ ते १०.४० या मुहूर्तावर तुम्ही बाप्पाचे विसर्जन करु शकतात. दुपारी १.४३ ते रात्री ७.२४ हा मुहूर्त बाप्पाला निरोप देण्यासाठी चांगला आहे. तर रात्री १०.४४ ते १२.१२ मध्ये बाप्पाचे विसर्जन तुम्ही करु शकता.

बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी विविधत पूजा आणि आरती करुनच बाप्पाला निरोप द्या. बाप्पाच्या आवडीचा नैवद्य दाखवून ढोल ताशांच्या गजरात, मोठ्या भक्तिभावात बाप्पाला निरोप द्या. बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा यायचे आमंत्रण द्या. काही चुकलं असेल तर बाप्पाची माफी मागून विसर्जन करा.

विसर्जनाच्यावेळी तलावात किंवा समुद्रात निर्माल्य टाकू नका, यामुळे प्रदुषण वाढते. तसेच बाप्पाचे विसर्जन करताना पर्यावरणाची देखील काळजी घ्या. जर तुम्ही घरात बाप्पाचे विसर्जन करणार असाल तर टब किंवा ड्रममध्ये विसर्जन करा. ज्यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारांची हानी होणार नाही याची देखील काळजी घ्या.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Ganesh Visarjan 2023
Yoga To Reduce Hair Fall : केस गळतीमुळे रडकुंडीला आला आहात? नियमित करा ही योगासने, गळणं होईल कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com