Ganeshotsav Aarti : बाप्पाच्या भक्तीत भाविक तल्लीन; 'या' आरत्यांनी गणरायाला करा नमन

Ganeshotsav Aarti List : गणपती बाप्पाची सेवा करताना महत्वाच्या या आरती म्हटल्याच पाहिजेत. आजच नोट करून ठेवा आरतीची यादी.
Ganeshotsav Aarti List
Ganeshotsav Aarti Saam TV
Published On

गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन दोन्हीमुळे राज्यात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. गणपती बाप्पाची पुजा करताना विविध पुजेच्या विधीसह आरती सुद्धा फार महत्वाची माणली जाते. आरतीमध्ये कोणकोणत्या आरती घ्याव्यात या बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

गणपती आरती सर्वांनाच येते असं नाही. काही व्यक्तींची आरती पाठ असली तरी त्यांना त्यातील शब्द माहिती नसतात. अनेक जण तर चुकीचा शब्द उच्चार निट जमत नाहीत. त्यामुळे आज आम्ही बाप्पासाठी खास आणि महत्वाच्या असलेल्या आरती तुमच्यासाठी आणल्या आहेत.

Ganeshotsav Aarti List
Mumbai Ganeshotsav: क्युआर कोडवरुन कृत्रिम तलावांची माहिती, १२ हजार अधिकारी तैनात; 'श्रीं'च्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज!

सुखकर्ता दुखहर्ता आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफळाची ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरे जडित मुकुट शोभतो बरा

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया॥

लंबोदर पितांबर फनी वरवंदना

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना

जय देव जय देव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

घालीन लोटांगण आरती

घालीन लोटांगण वंदिन चरन

डोळ्यांनी पाहीं रुप तुझे

प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं

भावे ओवालीन म्हणे नामा

त्वमेव माता पिता त्वमेव॥

त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्वम मम देव देव

कयें वच मनसेन्द्रियैवा

बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा

करोमि यद्यत सकलं परस्मै

नारायणायेति समर्पयामि॥

अच्युत केशवम रामनरायणं

कृष्णदामोदरं वासुदेवं हरी

श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं

जानकीनायकं रामचंद्रम भजे॥

हरे राम हरे राम

राम राम हरे हरे

हरे कृष्णा हरे कृष्णा

कृष्णा कृष्णा हरे हरे॥

हरे राम हरे राम

राम राम हरे हरे

हरे कृष्णा हरे कृष्णा

कृष्णा कृष्णा हरे हरे ॥

गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरया आरती

गजानना श्रीगणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया ॥

सिंदुर-चर्चित धवळे अंग

चंदन उटी खुलवी रंग

बघतां मानस होतें दंग

जीव जडला चरणी तुझिया

आधी वंदू तुज मोरया ॥

गजानना श्रीगणराया

आधी वंदू तुज मोरया ॥

गौरीतनया भालचंद्रा

देवा कृपेच्या तूं समुद्रा

वरदविनायक करुणागारा

अवघी विघ्नें नेसी विलया

आधी वंदू तुज मोरया॥

गजानना श्रीगणराया

आधी वंदू तुज मोरया ॥

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा

चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा

रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी

कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥

देव सुरवर नित्य येती भेटी

गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ॥

राई-रखुमाबाई राणीया सकळा

ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥

दिंड्या पताका वैष्णव नाचती

पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती

चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती

केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥

Ganeshotsav Aarti List
Ganeshotsav In Africa: सातासमुद्रापार भारतीयांनी साजरा केला गणेशोत्सव; PHOTO पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com