Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा, जाणून कोणत्या चुका टाळायला हव्या

Ganesh Chaturthi Special : या दिवसात आपल्याकडून काही नकळत चुका होतात. ज्याचा नंतर आपल्याला त्रास होतो अशावेळी काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Saam Tv
Published On

Ganesh Chaturthi Dos and Don'ts:

आज गणेश चतुर्थी. लाडका गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरोघरी विराजमान झाला असेल. बाप्पासाठी आपण त्याच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ देखील ठेवलेच असतील.

१९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दहा दिवसांच्या काळात अनेक भक्तगण बाप्पाची पूजा करतील. हिंदू पंचागानुसार जर आपण घरी गणपती बसवत असू तर त्याची विधीवत पूजा करायला हवी. तसेच १० दिवस लाडक्या बाप्पाची आरती आणि त्याला प्रसादही दाखवयला हवा. परंतु, या दिवसात आपल्याकडून काही नकळत चुका होतात. ज्याचा नंतर आपल्याला त्रास होतो अशावेळी काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 Wishes : आतुरता फक्त आगमनाची..., तुमच्या प्रियजनांना पाठवा गणेश चतुर्थीच्या हटके शुभेच्छा!

1. पूजेच्या (Puja) साहित्यात गणपतीला (Ganpati) सिंदूर दुर्वा आणि मोदक अर्पण करा. तर बाप्पाच्या पूजेत केतकीची फुले, तुळस वापरु नका. तसेच सुकलेली फुले देखील अर्पण करु नका.

2. गणपतीचा आवडता रंग लाल आणि पिवळा आहे. या रंगाचे कपडे घालून पूजा करा. या १० दिवसात काळ्या रंगाचे कपडे घालू नका.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा मोरया..., श्रीगणेशाच्या जयघोषात 'मोरया' का म्हटले जाते? याचा नेमका अर्थ काय?

3. तसेच गणेश उत्सवादरम्यान मांस आणि मद्यसेवन टाळावे. तसेच तामसिक आहारापासून (Food) अर्थात कांदा-लसणाचे सेवन करु नये. नैवेद्यातही कांदा लसणाचा वापर करु नये. गणेश चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावे. या काळात अपशब्द काढू नये. कोणाशीही वादही घालू नका.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com