Ganeshotsav 2023 : महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कोणी सुरु केली आणि का? जाणून घ्या

Ganeshotsav In Maharahstra : गणेश चतुर्थी हा संपूर्ण हिंदू धर्मासाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे.
Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023Saam Tv

Ganesh Chaturthi 2023 :

गणेशोत्सव हा संपूर्ण हिंदू धर्मासाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे. जो देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा हिंदू कॅलेंडरच्या भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. लोक गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणतात, त्यांच भव्य शैलीची पूजा करतात. आणि नंतर दहा दिवसांनी विसर्जन करतात.

पण गणेशोत्सव ही महाराष्ट्रसह (Maharashtra), गोवा आणि तेलंगणासारख्या शहरांमध्येही हा सण अधिक लोकप्रिय आहे. याठिकाणी गणपतीचे मोठमोठे मंडप उभारले जातात. घरोघरी गणेशमूर्तींचे जल्लोषात स्वागत केले जाते.

Ganeshotsav 2023
Ganpati Festival 2023: गणरायाला दुर्वा का प्रिय आहे

या शहरांमध्येच धूम का असते?

गणेशोत्सव हा सण मुंबई आणि पुण्यात सामाजिक सण (Festival) म्हणून साजरा केला जातो. देशभरात साजरा होत असला तरी मुंबई आणि पुण्यात या उत्सवाचे ग्लॅमर वेगळेच आहे. मोठमोठे मंडप, भव्य आरती, श्रीगणेशाची भव्य मुर्ती आणि सजावट हा त्याचा एक भाग आहे.

भारत पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना समोर आणली. आणि गणेशोत्सव साजरा करण्यात आला. येथेच स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली.

‘लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरूवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्षे आधी म्हणजेच 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला’असे भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट म्हणतात त्यामुळे गणेशोत्सव स्वातंत्र्य काळात सुरू करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com