Gandhi Jayanti 2023 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी विचार, विद्यार्थ्यांना कधीच येणार नाही अपयश

Mahatma Gandhi Quotes : मोहनदास करमचंद गांधी यांच्या दृढनिश्चय, सत्य आणि अहिंसेचा मार्ग मिळवून जगभरात ओळखले जाणारे एक महत्त्वपूर्ण नाव
Gandhi Jayanti 2023
Gandhi Jayanti 2023Saam Tv
Published On

Mahatma Gandhi Thoughts :

दरवर्षी भारतात २ ऑक्टोबर हा गांधी जयंती म्हणून साजरी केली जाते. आज त्यांची १५४ वी जयंती आहे. मोहनदास करमचंद गांधी यांच्या दृढनिश्चय, सत्य आणि अहिंसेचा मार्ग मिळवून जगभरात ओळखले जाणारे एक महत्त्वपूर्ण नाव.

गांधीजीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांनी ब्रिटिश राजवटीला नतमस्तक होण्यास भाग पाडले. ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर गांधीजीचे हे नियम नेहमी लक्षात ठेवा

Gandhi Jayanti 2023
Shardiya Navrati 2023: शारदीय नवरात्रौ उत्सव कधी पासून? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

1. अहिंसा

गांधीजींनी दिलेल्या सर्वात मौल्यवान आणि चिरस्थायी गोष्टींपैकी एक म्हणजे अहिंसेची शक्ती, ज्याला आपण अहिंसा म्हणून देखील ओळखतो. त्यांनी सांगितले की, कोणत्याही गोष्टीत शांततापूर्ण प्रतिकाराने महत्त्वपूर्ण सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणता येतात.

2. सत्य आणि प्रामाणिकपणा

सत्य आणि प्रामाणिकपणा ही महात्मा गांधींनी शिकवलेली मूलभूत मूल्ये आहेत. स्वातंत्र्यलढ्यातून त्यांनी दाखवून दिले की, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. खऱ्या आयुष्यातील (Life) अनेक घटनांवरुनही ते सिद्ध होते. म्हणून नेहमी सत्याच्या वाटेवर चाला

3. क्षमाशीलता

गांधीजी म्हणतात की, नेहमी क्षमाशील राहा. कमकुवत लोक सतत राग करतात आणि सूडाची योजना आखतात. समोरच्याला माफ करणे हा एक मार्ग आहे. इतरांना क्षमा केल्याने आपण आपल्या मतभेदावर मात करु शकतो.

4. चिकाटी

जोपर्यंत हवी ती गोष्ट साध्य होत नाही तोपर्यंत संयम असणे गरजेचे आहे. जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा आपण हार मानतो. महात्मा गांधींनी आपल्या जीवनातून सांगितले की, वाट कितीही कठीण असली तरी चिकाटी आपल्याला नेहमी पुढे घेऊन जाते.

Gandhi Jayanti 2023
Famous Place In Vidarbha: विदर्भातील ही ठिकाणे जणू स्वर्गच, कुटुंबियांसह लुटा मनमुराद आनंद

5. शिक्षणाचे महत्त्व

गांधीजींनी वैयक्तिक विकास आणि राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे त्यामुळे आयुष्याला कसा आकार मिळतो हे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com