तुमचेही वारंवार डोके दुखते का, मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे

डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये (LifeStyle) काही बदल करावे लागतील.
तुमचेही वारंवार डोके दुखते का, मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे
तुमचेही वारंवार डोके दुखते का, मग ही बातमी तुमच्यासाठीच आहेSaam tv
Published On

आपल्यातील अनेकांना डोकेदुखीची (Headache) समस्या भेडसावत असते. उलटसुलट खाणे, चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अनेकदा डोकेदुखीचा सामना कारावा लागतो. प्रचंड थकवा (Fatigue), कामाचा ताणतणाव(Work stress), अति मद्यपान-धुम्रपान, (Heavy drinking-smoking), कॉफी, चहाचे अतिप्रमाणात सेवन (Excessive consumption of coffee, tea) अशा एक ना अनेक कारणांमुळे आपल्याला डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. जर आपण देखील डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (If you also have frequent headaches, then this news is for you)

तुमचेही वारंवार डोके दुखते का, मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे
लहान मुलांसाठी फायदेशीर आहे भाताचे पाणीच; कसे, एकदा वाचाच

डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये (LifeStyle) काही बदल करावे लागतील. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय़ सांगत आहोत, ज्यामुळे तुमचा डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

डोकेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी या गोष्टी बदला

1. या गोष्टींचा वापर करा

आपण दिवसभरात जे काही खात असतो ते आपल्या डोकेदुखीला कारणीभूत ठरते. कॉफी, चहा, अल्कोहोल आणि खारट पदार्थांचे (Snacks) जास्त प्रमाणात सेवन केल्याने तीव्र डोकेदुखी होऊ शकते. बर्‍याच वेळा जेवण न केल्याने डोकेदुखी देखील होऊ शकते. डोकेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी आपण आपल्या आहारात फळे, भाज्या आणि धान्यांचा समावेश करू शकता.

2. बसताना योग्य पोजीशनमध्ये बसा

तुम्ही खुर्चीवर बसून काम करत असाल तर आपला पाठीचा मनका सरळ ठेवा, म्हणजेच ताठ बसा. पाठीत बाक काढून बसण्याने मान आणि खांद्यावर दबाव येतो ज्यामुळे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते. तसेच खुर्चीवर बसले असालतर वारंवार आपली पोजीशन बदलत रहा. आपला मणका सरळ ठेवा, लॅपटॉप आपल्या डोळ्यांत आणि खांद्यांच्या सरळ रेषेत ठेवा.

3. ताण घेऊ नका

ताणतणाव देखील डोकेदुखीचे एक प्रमुख कारण आहे. आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार ताणतणाव आणि मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, जर आपण वारंवार डोकेदुखीमुळे त्रस्त असाल तर ताणतणाव घेऊ नका. ताणतणावापासून दूर राहण्यासाठी दररोज ध्यान, श्वासाचे व्यायाम आणि योगासने करण्याने ताण कमी होतो. जर आपण मोठ्या तणावातून जात असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4 अल्कोहोलपासून दूर रहा

मद्यपान करण्याची सवय तुमची फुफ्फुस, आतडे आणि रोगप्रतिकारक शक्ती खराब करण्याचे कार्य करते. धूम्रपान आणि मद्यपान केल्याने डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्ही रिकाम्या पोटी जास्त धूम्रपान केले तर डोकेदुखीची समस्या वाढू शकते. निकोटीनमुळे ही समस्या उद्भवू शकते. निकोटीनमुळे रक्तदाब कमी होतो आणि मेंदूमध्ये रक्तदाब कमी झाल्यास तीव्र डोकेदुखी होते. म्हणून मद्यपान करणे टाळा.

5. पुरेशी झोप न घेणे

कधीकधी पुरेशी झोप न घेतल्यास डोकेदुखी सुरु होते. दिवसभर काम केल्यावर तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असते. मात्र पुरेशी झोप न झाल्यास मेंदूवरील दबाव आणि झोपेची कमतरता यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील लेखात दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com