लहान मुलांसाठी फायदेशीर आहे भाताचे पाणीच; कसे, एकदा वाचाच

बाळांना काही कडक पदार्थ खाऊ घालण्याऐवजी भाताचे पाणी देणे फायदेशीर ठरते. हे पाणी त्यांना कडक अन्नपदार्थ पचविण्यासाठी मदत करतात.
लहान मुलांसाठी फायदेशीर आहे भाताचे पाणीच; कसे, एकदा वाचाच
लहान मुलांसाठी फायदेशीर आहे भाताचे पाणीच; कसे, एकदा वाचाच Saam tv

तांदळामध्ये (Rice) असे बरेच गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लहान मुलांना तांदळाचे पाणी (भाताचे पाणी) (Rice Water) देण्याची शिफारस तज्ञ डॉक्टर्स करत असतात. तांदळाच्या पाण्यामध्ये तांदळातील पोषक घटकांचा समावेश असतो. हे केवळ त्यांच्या आरोग्यासाठीच फायदेशीर ठरत नाही तर आरोग्याच्या समस्यांपासून त्यांना आराम देखील देते. बाळाला तांदळाचे पाणी देणे फायदेशीर असण्याची अनेक कारणे आहेत. (Rice water is beneficial for small children)

बाळांना भाताचे पाणी देण्याची योग्य वेळ

डब्ल्यूएचओच्या(WHO) मते, जन्मानंतर पहिले ६ महिने नवजात बाळांना केवळ स्तनपान (Breastfeeding) दिले पाहिजे. यानंतर, त्यांना स्तनपानासह फॉर्म्युला दूध दिले जाऊ शकते. त्याचबरोबर, बाळांना काही कडक पदार्थ खाऊ घालण्याऐवजी भाताचे पाणी देणे फायदेशीर ठरते. हे पाणी त्यांना कडक अन्नपदार्थ पचविण्यासाठी मदत करतात.

लहान मुलांसाठी फायदेशीर आहे भाताचे पाणीच; कसे, एकदा वाचाच
चेहऱ्यावरील पांढऱ्या पुरळांसाठी करा हे सोपे उपाय

बाळांना तांदळाच्या पाण्याचे आरोग्यासाठी फायदे

आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह (Dr. Ranjana Singh) यांच्या मते, भाताच्या पाण्यातील जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ मुलांसाठी फायदेशीर असतात. भाताचे पाणी दिल्यामुळे बालकांचे स्तनपानावारील अवलंबित्व योग्य वेळी कमी करता येऊ शकते. मात्र, स्तनपानाला पर्याय म्हणून बाळांना हे पाणी देणे चुकीचे आहे.

लहान मुलांना भाताचे पाणी देण्याचे फायदे

१ भाताच्या पाण्यात व्हिटॅमिन बी 6, नियासिन आणि राइबोफ्लेविन सारखे पोषक पदार्थ मिळतात. मुलांच्या वाढीसाठी आणि मजबूत आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी खूप महत्वाचा आहे.

२ लहान मुलांचे शरीर विकसनशील असते, आणि मुलांच्या विकासासाठी भरपूर ऊर्जा आवश्यक आहे. तांदळाच्या पाण्यात पुरेसे कार्बोहायड्रेट असतात, ज्यामुळे मुलांना थकवा व अशक्तपणाचा येत नाही.

३ मुलांना अतिसार होण्याची समस्या सामान्य आहे. अशावेळी लहान मुलांना भाताचे पाणी दिल्यास त्यांच्यातील अशक्तपणा दूर होऊन शरीरातील ऊर्जा वाढीस मदत होते.

अशा प्रकारे मुलांसाठी भाताचे पाणी

आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी मुलांसाठी भाताचे पाणी कसे बनवायचे याची माहिती दिली आहे.

सर्वप्रथम, 2 ते 3 चमचे पांढरे तांदूळ कोमट पाण्याने चांगले धुवून घ्यावेत.

नंतर एका भांड्यात तांदूळ आणि १ कप पाणी उकळा.

तांदूळ मऊ शिजल्यावर एका कपात पाणी गाळून घ्या.

चमच्याच्या मदतीने हे पाणी लहान मुलांना हळूहळू पाजा.

(टीप : वरील लेखात दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com