Headache Problem : मायग्रेनशिवाय या कारणांमुळे वाढू शकतो डोकेदुखीचा त्रास, जाणून घ्या कारण

Migraine Problem : मायग्रेन सोडून डोकेदुखी होण्याची इतर अनेक कारणे आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
Headache Problem
Headache ProblemSaam Tv
Published On

Headache Symptoms :

बऱ्याच लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ते सतत चिंतेत राहातात. लांबचा प्रवास, उपवास, मोठा आवाज यांसारख्या इतर कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते.

बहुतेकांना डोकेदुखीचा त्रास कधीतरी होतो. परंतु, जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असेल तर त्याचे कारण ओळखा. सध्या जगभरात मायग्रेनचा त्रास सध्या वाढताना दिसून येत आहे. यामध्ये सतत डोकेदुखी, मळमळ, उलटी येणे किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, मायग्रेन सोडून डोकेदुखी होण्याची इतर अनेक कारणे आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वारंवार डोकेदुखीचा त्रास कशामुळे होतो हे जाणून घेऊया

1. हार्मोनल समस्या

हार्मोनल बदल अनेक कारणांमुळे होतात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. ज्यामुळे डोकेदुखीचा (Headache) त्रास सहन करावा लागतो. तसेच पीरियडमध्ये देखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

Headache Problem
Air Pollution Effects On Skin : प्रदूषण करतंय तुम्हाला कमी वयात म्हातारं, कशी घ्याल त्वचेची काळजी

2. मायग्रेन

मायग्रेनमुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. ही वेदना महिन्यातून दोन ते चार वेळा होऊ शकते. वेदनेसोबत अस्वस्थता किंवा उलट्या होणे, भूक न लागणे आणि पोट खराब होऊ शकते.

3. सायनस

सायनस हे डोकेदुखीचे सगळ्यात मोठे कारण आहे. यामुळे जळजळ किंवा संसर्ग, नाक, कपाळ आणि नाकाच्या वरच्या भागात तीव्र आणि सतत वेदना होतात. याव्यतिरिक्त या वेदनेमुळे सामान्यत: नाक वाहाणे, ताप येणे आणि चेहऱ्यावर (Skin) सूज येऊ शकते.

Headache Problem
Parenting Tips : पालकांनो, ५ वर्षांच्या मुलांना या गोष्टी माहित असायलाच हव्या

4. डिहायड्रेशन

जेव्हा शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी (Water) मिळत नाही. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. डिहायड्रेशनच्या समस्यांमध्ये चक्कर येणे, सतत तहान लागणे, तोंड कोरडे पडण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com